शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रोत्साहन भत्त्यापासून विद्यार्थिनी वंचित!

By admin | Updated: April 19, 2017 01:43 IST

मुख्याध्यापकांची उदासीनता : ५७ शाळांमधील विद्यार्थिनींना प्रत्येकी तीन हजार रुपये भत्ता

नितीन गव्हाळे - अकोलाअनुसूचित जाती, जमातीमधील एकही विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये, विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शासनाच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून वार्षिक तीन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता योजना सुरू केली; परंतु शासनाच्या योजनेला मुख्याध्यापकांकडूनच सुरुंग लावल्या जात आहे. मुख्याध्यापकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील ५७ शाळांमधील ६५० विद्यार्थिनी प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहावे लागत आहेत. अनुसूचित जाती, जमातीमधील विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने माध्यमिक शिक्षण विभागाने २०१४ व १५ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता मिळावा, यासाठी जिल्ह्यातील शाळांकडून आॅनलाइन प्रस्ताव मागविले होते. यात विद्यार्थिनींची संख्या, त्यांचे खातेक्रमांक आणि शाळेचे नाव आदी माहिती आॅनलाइन प्रस्तावामध्ये भरण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्ह्यातील काही शाळांनी ही माहिती आॅनलाइन भरली. शासनाकडून ५७ शाळांमधील ६५० विद्यार्थिनींना प्रत्येकी तीन हजार रुपयेप्रमाणे प्रोत्साहन भत्त्याचे अनुदान शिक्षण विभागाला प्राप्त झाले; परंतु शाळेच्या मुख्याध्यापकांनी अद्यापपर्यंत दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींची माहितीसह बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएफएससी कोड, विद्यार्थिनीचे आसन क्रमांक आणि दहावीत मिळालेल्या टक्केवारीची माहितीच शिक्षण विभागाला दिली नाही. विद्यार्थिनींची माहिती देण्यास मुख्याध्यापक उदासीन असल्याचे दिसून येत आहे.शिक्षण विभागाकडून वारंवार मुख्याध्यापकांकडे माहिती पाठविण्याचा आग्रह धरल्यानंतरही मुख्याध्यापकांकडून माहिती पाठविण्यात येत नसल्याने विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे. यावर्षी १४२ शाळांचे प्रोत्साहन भत्त्यासाठी प्रस्तावयेत्या २०१७ व १८ या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता मिळावा, यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शाळांकडून आॅनलाइन प्रस्ताव मागविले होते. यात विद्यार्थिनींची संख्या, त्यांचे खातेक्रमांक आणि शाळेचे नाव आदी माहिती आॅनलाइन प्रस्तावामध्ये भरण्यास सांगितले होते. त्यानुसार जिल्ह्यातील १४२ शाळांनी शिक्षण विभागाकडे प्रोत्साहन भत्त्यासाठी आॅनलाइन माहिती भरली. यापैकी ३३ शाळांमध्ये प्रस्ताव तांत्रिक अडचणींमुळे अपलोड होऊ शकले नाहीत.१ कोटी ९५ लाखांचा प्रोत्साहन भत्ता परत जाण्याची भीतीशासनाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमातीमधील विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता म्हणून १ कोटी ९५ लाख रुपयांचे अनुदान शिक्षण विभागाकडे जमा केले; परंतु मुख्याध्यापक विद्यार्थिनींची माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याने विद्यार्थिनींना विनाकारण तीन हजार रुपयांच्या प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित राहावे लागत आहे. एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थिनींसाठी १ कोटी ९५ लाख रुपये प्रोत्साहन भत्त्यासाठी मिळाले आहेत; परंतु मुख्याध्यापकांच्या उदासीनतेमुळे विद्यार्थिनींना रकमेपासून वंचित राहावे लागत आहे. - आत्माराम राठोड, सहायक शिक्षण उपनिरीक्षक