शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेचे उद्घाटन

By admin | Updated: August 28, 2014 23:54 IST

पियू उकेची विजयी सलामी

अकोला: विदर्भ कॅरम असोसिएशन सभागृहात आजपासून सुरू झालेल्या विदर्भ राज्य व आंतर जिल्हा कॅरम स्पर्धेला पियू उके याने विजयी सलामी दिली. कॅडेट बॉईज गटात प्रथम फेरीमध्ये पियू उके व तेजस बचे यांच्यात पहिली लढत झाली. यामध्ये पियूने २५-१, २५-0 असा एकतर्फी विजय मिळविला.ऋषिकेश मोरे व रुद्र देशमुखमध्ये झालेल्या लढतीत २५-0, २५-३ ने ऋषिकेशने विजय मिळविला. यश दुबे याने लौकिक उजवणे याच्यावर २५-0, २५-३ असा विजय मिळविला. साईकृष्णा दहीकर याने युवराज बोरकुटेवर २५-0, २५-५ गुणाने मात केली. कॅडेट गटातील सर्व लढती एकतर्फी झाल्या.सब ज्युनिअर मुलींमध्ये अमिता ठोसरे, अबोली पाटील, नयना यादव, पूजा लाडखेडकर मुलांमध्ये आयुष राठी, नीलाक्ष चव्हाण, दीपक पाटील यांनी विजय मिळविला. ज्युनिअर बॉईज एकेरीमधील दुसर्‍या फेरीत ज्ञानेश्‍वर केदार, शेख नदीम, रूपेश दहीकर, प्रदीप राठौड, सुमित परदेशी, यश दामोदर, फैजल बुधवानी, राधेश्याम पटेकर. ज्युनिअर गर्ल्स गटात प्रथमफेरीत पूनम किसकर, नेहा यादव, मेघा बंग, चंदा शास्त्री यांनी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला.तत्पूर्वी, स्पर्धेचे उद्घाटन ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे उपाध्यक्ष संदीप पुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अकोला डिस्ट्रीक्ट अँटोमोबाईल्स डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत राठी यांची प्रमुख उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय कॅरम पंच जे.व्ही. संगम यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या स्पर्धेत १५0 च्या वर स्पर्धक सहभागी झाले आहेत. सिमको या मान्यताप्राप्त कॅरम बोर्डवर सामने खेळण्यात येत असून, स्पर्धेतील विजेते राष्ट्रीय स्पर्धेत विदर्भाचे प्रतिनिधित्व करतील, असे कॅरम फेडरेशनचे सरचिटणीस प्रभजितसिंह बछेर यांनी सांगितले. स्पध्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.