शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

युपीएससी परीक्षा उत्तीर्ण प्रांजलच्या प्रकृतीत सुधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST

पातूर तालुक्यातील तांदळी येथील केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या प्रांजल प्रभाकर नाकट या युवकाला कोरोनाची बाधा झाली. त्याची ...

पातूर तालुक्यातील तांदळी येथील केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या प्रांजल प्रभाकर नाकट या युवकाला कोरोनाची बाधा झाली. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश नेते कृष्णाभाऊ अंधारे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्या पुढाकारामुळे त्याच्यावर उपचार करण्यासाठी हैदराबाद येथून पाच डॉक्टरांची चमू गत आठवड्यात विमानाने अकोल्यात दाखल झाली होती. डॉक्टरांनी तातडीने मध्यरात्री २ वाजता उपचार सुरु करून पुढील उपचारासाठी प्रांजलला हैदराबाद येथे एअर ॲम्ब्युलन्स अकोल्यातून हलविण्यात आले होते. सामान्य कुटुंबातील प्रांजलचे जीव वाचविण्यासाठी वडील प्रभाकर नाकट आणि आई अनुराधा नाकट यांनी शर्थीचे प्रयत्न करून नातेवाईकांच्या मदतीने ५५ लाख रुपयाची रक्कम जोडली होती.

फोटो:

प्रांजल आता धोक्याबाहेर

एक आठवड्याच्या उपचारानंतर बेशुद्ध अवस्थेतील प्रांजलने डोळे उघडले असून आता त्याची तब्येत धोक्याबाहेर असल्याचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे नाकट कुटुंबीयांना थोडाबहुत दिलासा मिळाला आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी अनेकजण प्रार्थना करीत आहेत.

नाकट कुटुंबीयांची लोकमतप्रति कृतज्ञता

प्रांजल नाकट याला हैदराबादला उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सने पाठविल्यानंतर त्याचे वडील प्रभाकर नाकट आणि नातेवाईक वाहनाने हैदराबादकडे निघाले. यवतमाळ-नेर चेकपोस्टजवळ त्यांना पोलिसांनी थांबवून, त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडे परप्रांतात जाण्यासाठी ई-पास नसल्यामुळे पोलीस त्यांना पुढे जाऊ देईनात. यावेळी त्यांनी मुलाच्या प्रकृतीबाबत व लोकमतमधील प्रांजलची बातमी दाखविली. लोकमतमधील वृत्त पाहून, पोलिसांनी पासशिवाय त्यांना पुढे जाण्यास परवानगी दिली. त्यामुळे लोकमतप्रति नाकट परिवाराने कृतज्ञता व्यक्त केली.