शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘एनसीआयएसएम’ विधेयकात सुधारणा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 02:18 IST

अकोला : नीती आयोगाने ‘एनसीआयएसएम’ या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा जाहीर केला असून, या मसुद्यातील काही मुद्दे आयुर्वेद, युनानी व सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांसाठी अन्यायकारक असल्यामुळे या मसुद्यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी या चिकित्सकांची देशव्यापी संघटना ‘निमा’ सरसावली आहे.

ठळक मुद्दे‘निमा’चा मूक मोर्चा मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सादर

अकोला : नीती आयोगाने ‘एनसीआयएसएम’ या प्रस्तावित विधेयकाचा मसुदा जाहीर केला असून, या मसुद्यातील काही मुद्दे आयुर्वेद, युनानी व सिद्ध या भारतीय चिकित्सा पद्धतीच्या चिकित्सकांसाठी अन्यायकारक असल्यामुळे या मसुद्यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी या चिकित्सकांची देशव्यापी संघटना ‘निमा’ सरसावली आहे. आपल्या मागण्यांसाठी ‘निमा’कडून राष्ट्रव्यापी आंदोलन छेडण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी ‘निमा’ अकोला शाखेच्यावतीने मूक मोर्चा काढून उप निवासी  जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.नीती आयोगाद्वारे प्रस्तावित असलेला ‘एनसीआयएसएम’ या विधेयकाच्या मसुद्यातील काही मुद्दे भारतीय चिकित्सा पद्धतीचा अवलंब करणार्‍या डॉक्टरांना कसे त्रासदायक आहेत, याचा ऊहापोहच डॉ. कुळकर्णी यांनी केला. या प्रस्तावित विधेयकान्वये, भारतीय चिकित्सा पद्धतीचा अवलंब करणार्‍या डॉक्टरांची शिखर परिषद अर्थात केंद्रीय चिकित्सा परिषद (सीसीआयएम) बरखास्त होणार आहे. तसेच इंडियन मेडिकल सेंट्रल कौन्सिल अँक्ट १९७0 हा ४७ वर्षांपासून प्रचलित असलेला कायदा रद्द होणार आहे. हा कायदा भारतीय चिकित्सा पद्धतीचा अवलंब करणार्‍या डॉक्टरांना आधुनिक चिकित्सा पद्धतीचा अधिकार व दर्जा देणारा असून, तो रद्द झाल्यास या डॉक्टरांचा मूलभूत अधिकार व हक्क संपुष्टात येणार आहे. आपल्या हक्कासंदर्भात पाठपुरावा करण्यासाठी टप्प्या-टप्प्याने आंदोलन करण्यात येणार असून, त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी ‘निमा’ अकोला शाखेच्यावतीने मूक मोर्चा काढण्यात आला. अशोक वाटिकेपासून सुरू झालेल्या या मोर्चात ‘निमा’ संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते. अत्यंत शांतपणे मार्गक्रमणा करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. या मोर्चामध्ये जिल्हाभरातून आलेले जवळपास ४00 डॉक्टर सहभागी झाले होते. तेथे उपनिवासी जिल्हाधिकार्‍यांना मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदन पंतप्रधानांकडे पाठविण्यात येणार आहे.  मोर्चामध्ये संघटनेचे डॉ. आशुतोष कुळकर्णी, डॉ. संजय तोष्णिवाल, डॉ. दिनेश राठी, डॉ. निखिल बक्षी, डॉ. मिलिंद बडगुजर, डॉ. वर्षा बडगुजर, डॉ, आनंद चतुर्वेदी, डॉ. दिलीप मानकर, डॉ. मनोहर घुगे, डॉ. माया ठाकरे, डॉ. वर्षा देशपांडे, डॉ. अजहर पांडे, पूजा डोंगरे यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते.