शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आयात धोरण निश्चितीआधीच वधारले खाद्य तेलाचे भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 13:49 IST

अकोला : खाद्य तेलाच्या आयातीवर इम्पोर्ट ड्युटी लावण्यासंदर्भातील सरकारचे धोरण निश्चितही झालेले नसताना बाजारपेठेत तेलाचे भाव वधारले आहे.

-  संजय खांडेकर  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खाद्य तेलाच्या आयातीवर इम्पोर्ट ड्युटी लावण्यासंदर्भातील सरकारचे धोरण निश्चितही झालेले नसताना बाजारपेठेत तेलाचे भाव वधारले आहे. तेलाच्या भावात होत असलेल्या कृत्रिम भाववाढीमुळे सर्वसामान्य लोकांच्या घरातील भाजीची फोडणी महागली आहे.देशांतर्गत लागणाऱ्या खाद्य तेलाच्या मागणीच्या तुलनेत तेलाची निर्मिती करणे अजूनही शक्य नाही. त्यामुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणात खाद्य तेल देशात आयात करण्याची वेळ येते. ही व्यवस्था गत अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. अब्जावधीची उलाढाल जागतिक पातळीवर होते. यावर लक्ष केंद्रित करून सरकारने अधिवेशनात आयात धोरणात बदल करण्यावर चर्चा केली. त्यात तेलाची इम्पोर्ट ड्युटी ३ ते १० टक्क्यांपर्यंत का वाढविण्यात येऊ नये, यावर चर्चा झाली. सरकारने अद्याप आयात धोरणावर चर्चा सुरू केलेली असली तरी देशातील तेल बाजारातील भाव वाढण्यास सुरुवात झाली आहे. खाद्य तेल आयात धोरण निश्चित होण्याआधीच बाजारपेठ तेलाचे भाव वाढले आहे. बाजारातील काळाबाजार थांबविण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.

खाद्य तेलाच्या इम्पोर्ट ड्युटी वाढविण्याचा किंवा सेस लावण्याचा सरकार निर्णय होणार आहे. त्यावर विचारविनिमय सुरू आहे; मात्र तेल भाववाढ अजून तरी झालेली नाही. त्यामुळे कुणी करीत असेल तर ते चुकीचे आहे.-वसंत बाछुका, उद्योजक अकोला.या महिन्यातील किराणा खरेदीच्या तेलामध्ये पाच लीटरमागे १८५ रुपये जास्त घेण्यात आले. विचारणा केली असता, तेलाचे भाव वाढल्याचे सांगितले जात आहे. भाववाढीच्या नावावर ही लूट असून, त्यावर अंकुश लावण्याची गरज आहे.-सतीश हिवराळे, नागरिक

टॅग्स :Akolaअकोलाbusinessव्यवसाय