शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाव लोकमतचा - शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यासाठी ४२ लाखांचा प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:16 IST

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्याथिनींचा वर्षभरापासून प्रलंबित असलेला स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता आणि निर्वाह भत्ता देण्यासाठी ४२ लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांनी शुक्रवारी समाजकल्याण आयुक्तांकडे पाठविला.

अकोला : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहासह जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी-विद्याथिनींचा वर्षभरापासून प्रलंबित असलेला स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता आणि निर्वाह भत्ता देण्यासाठी ४२ लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांनी शुक्रवारी समाजकल्याण आयुक्तांकडे पाठविला.अकोल्यातील संतोषी माता मंदिराजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना २०१७-१८ या वर्षातील स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता अद्याप मिळाला नाही, तसेच दरमहा मिळणारा निर्वाह भत्ता गेल्या फेबु्रवारीपासून मिळाला नाही. भत्ता रकमेच्या लाभापासून वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थिनी वर्षभरापासून वंचित असताना, या समस्येसंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारींकडे सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे वृत्त २९ मार्च रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा प्रलंबित असलेला स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता तसेच निर्वाह भत्त्याची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी ४२ लाख रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव २९ मार्च रोजीच सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांनी समाजकल्याण आयुक्त कार्यालयाकडे पाठविला.सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्ह्यातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींचा प्रलंबित असलेला स्टेशनरी भत्ता, ड्रेसकोड भत्ता व निर्वाह भत्त्याची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी ४२ लाख रुपये निधी मागणीचा प्रस्ताव २९ मार्च रोजी समाजकल्याण आयुक्तांकडे पाठविला आहे.- अमोल यावलीकर,सहायक आयुक्त, सामाजिक न्याय विभाग, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोला