शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’ची कामे तातडीने सुरू करा!

By admin | Updated: March 19, 2015 01:43 IST

विभागीय आयुक्तांचे निर्देश; अकोला जिल्ह्यातील कामांचा घेतला आढावा.

अकोला: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये तातडीने कामे सुरू करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर यांनी बुधवारी येथे दिले.डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ.के.आर.ठाकरे सभागृह येथे आयोजित आढावा बैठकीत ते बालेत होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामाचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी प्रामुख्याने जिल्हाधिकारी अरुण शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक एस.आर. सरदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एम.देवेंदर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रमोदसिंह दुबे उपस्थित होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात निवड करण्यात आलेल्या २00 गावांमध्ये प्रस्तावित करण्यात आलेल्या कामांपैकी प्रत्येक गावात किमान एक-दोन जलसंधारणाची कामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राजूरकर यांनी दिले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात जास्तीत-जास्त जलसंधारणाची कामे करण्याच्या सूचना देत, यंत्रणानिहाय जिल्ह्यातील कामाचा आढावा विभागीय आयुक्तांनी यावेळी घेतला. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पंचायत समित्यांचे गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद, कृषी विभाग, पाटबंधारे, लघू सिंचन व वन विभागासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.*गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य द्या!जलयुक्त शिवार अभियानांतर्गत प्रामुख्याने तलाव आणि बंधार्‍यांमधील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य देऊन, गाळ काढण्याची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या.*सिंचन विहिरींची कामे पूर्ण करा!जिल्ह्यात धडक सिंचन व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या सिंचन विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त राजूरकर यांनी या आढावा बैठकीत दिले.