शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

‘आयएमए’चा आज ‘व्हाइट अलर्ट’ : देशभरातील ४ लाख डॉक्टर पेटवतील एक मेणबत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 11:21 IST

देशभरातील ४ लाख सदस्य डॉक्टर्स आणि रुग्णालये एक-एक मेणबत्ती पेटवून राष्ट्राला ‘व्हाइट अलर्ट’ देणार आहेत.

अकोला : देशभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी भारतातील डॉक्टर्स जिवापाड प्रयत्न करत आहेत. तरीही डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि समाजाकडून त्यांची होणारी वंचना यामध्ये वाढ होत आहे. या अनुचित घटनांचा प्रतीकात्मक निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे देशभरातील ४ लाख सदस्य डॉक्टर्स आणि रुग्णालये एक-एक मेणबत्ती पेटवून राष्ट्राला ‘व्हाइट अलर्ट’ देणार आहेत. या अनुषंगाने ‘आयएमए’ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने २२ व २३ एप्रिल २०२० रोजी शांततापूर्ण कार्यक्रम आखण्यात आला आहे.कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या, आयएमएचे सदस्य असलेल्या डॉ. लक्ष्मीनारायण रेड्डी या आॅर्थोपेडिक सर्जन असलेल्या तरुण डॉक्टरचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला. या डॉक्टरच्या अंत्यसंस्कारामध्ये तेथील स्थानिक लोकांनी अडथळा निर्माण केला. अंत्ययात्रेसाठी आलेल्या डॉक्टरच्या शोकाकुल परिवारावर अमानुष हल्ला केला गेला. एवढेच नव्हे तर डॉक्टरच्या मृतदेहाबाबत अत्यंत अशोभनीय, असंस्कृत आणि अमानवी वर्तन तेथील समाजकंटकांनी केले. अशाच घटनांची पुनरावृत्ती डॉ. सायमन आणि डॉ. सिओलो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत झाली. या साºया घटनांचा निषेध म्हणून आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी हिंसाचारविरोधी केंद्रीय कायदा व्हावा या मागणीसाठी बुधवार दि. २२ एप्रिल २०२० रोजी ‘आयएमए’च्यावतीने राष्ट्राला एक पांढरा इशारा देण्यात येणार आहे. या दिवशी रात्री ९ वाजता भारतातील ‘आयएमए’चे ४ लाख सदस्य डॉक्टर्स आणि रुग्णालये एक-एक मेणबत्ती पेटवून ठेवतील आणि राष्ट्राला पांढरा इशारा देतील, असे ‘आयएमए’, अकोलाने कळविले आहे.

 

टॅग्स :doctorडॉक्टरAkolaअकोला