शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आयएमएच्या अध्यक्षपदी पुरुषोत्तम तायडे, सचिव रणजित देशमुख

By admin | Updated: March 25, 2017 01:16 IST

इंडियन मेडिकल असोसिएशन अकोला शाखेची शुक्रवारी विशेष सभा पार पडली.

अकोला, दि. २४- इंडियन मेडिकल असोसिएशन अकोला शाखेची शुक्रवारी दुपारी स्व. डॉ. चारुशीला काळे स्मृती सभागृहात विशेष सभा पार पडली. या सभेमध्ये डॉक्टरांवर होणार्‍या हल्ल्यासंदर्भात चर्चा करण्यात आली, तसेच आयएमएचे अध्यक्ष डॉ. कैलास मुरारका, सचिव डॉ. जुगल चिराणिया, डॉ. किशोर पाचकोर यांचा कार्यकाळ संपत असल्याने, आयएमएच्या नवनियुक्त अध्यक्षपदी डॉ. पुरुषोत्तम तायडे यांच्या आणि सचिवपदी डॉ. रणजित देशमुख यांच्या नावाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. आयएमए अकोला शाखेच्या शुक्रवारी झालेल्या सभेमध्ये राज्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि राज्याच्या आयएमए पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्यासमक्ष मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून, त्याचे लवकरच आदेश दिल्या जातील, असे स्पष्ट केल्याचे सभेत सांगण्यात आले. या सभेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आंतरवासिता डॉक्टरांचीही उपस्थिती होती. या डॉक्टरांनीसुद्धा त्यांना रुग्णसेवा करताना रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. प्रसंगी त्यांना मारहाणही करण्यात येते, अशी माहिती सभेत दिली. त्यासाठी शासनाने आम्हाला संरक्षण द्यावे आणि आयएमएच्या पदाधिकार्‍यांनी आमच्या पाठीशी उभे राहावे, असे सांगितले. यावेळी अध्यक्ष डॉ. कैलास मुरारका, सचिव डॉ. जुगल चिराणिया, डॉ. किशोर पाचकोर यांचा कार्यकाळ संपत असल्याने, त्यांच्या जागेवर आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे आणि सहसचिव डॉ. रणजित देशमुख यांची अध्यक्षपदी व सचिवपदी घोषणा करण्यात आली. लवकरच त्यांचा पदग्रहण समारंभ घेण्यात येईल. या समारंभात डॉ. मुरारका व डॉ. चिराणिया हे त्यांच्याकडे पदभार सोपवतील.