शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

पूर्णा नदीच्या पात्रातून पाण्याचा अवैध उपसा

By admin | Updated: April 8, 2017 01:34 IST

मलकापूर- पूर्णा नदीच्या पात्रात अवैध मोटरपंपाद्वारे सुरु असलेल्या पाण्याच्या उपशामुळे एप्रिल अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीस शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

हनुमान जगताप - मलकापूरमलकापूर येथे सद्यस्थितीत नगर परिषद पाणी पुरवठा विभागातर्फे आठ दिवसाआड होणारा पाणी पुरवठा समाधानकारक आहे; मात्र पूर्णा नदीच्या पात्रात अवैध मोटरपंपाद्वारे सुरु असलेल्या पाण्याच्या उपशामुळे एप्रिल अखेरीस किंवा मेच्या सुरुवातीस शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. सुमारे पाऊण लाखावर लोकसंख्या असलेल्या मलकापूरवासीयांनी पूर्णा नदी पात्रातील हतनुर धरणाच्या बॅकवॉटरवर पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून राहावे लागते. धुपेश्वर येथून वाढीव पाणी पुरवठा योजनेद्वारा मलकापूरला पाणी पुरवठा केला जातो, तर तत्काळ किंवा अडीअडचणीत नळगंगा धरणाचे पाणी घेतल्या जाते. अलीकडच्या काळात शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. सन २०१२ च्या जनगणनेनुसार शहरात १३१७६ मालमत्ताधारक असल्याची माहिती आहे. त्यापैकी ५३३७ नागरिक, ४९ व्यापारी तर संस्थांनी नळजोडणी केल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे दोन हजारावर अवैध नळ कनेक्शन आहेत, असे सूत्रांनी सांगितले. पूर्णा नदीच्या पात्रातील हतनूर धरणाच्या बॅकवॉटरवर मलकापूरकरांचा पाणी पुरवठा अवलंबून आहे. त्याची अवस्था चांगली आहे; मात्र विद्यमान परिस्थितीत पूर्णा नदी पात्रातून अवैधरीत्या उपसा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अवैधरीत्या शेती पंपाद्वारे दररोज लाखो लिटर पाणी उचलले जात आहे. परिणामी, बॅकवॉटरची पातळी दिवसेंदिवस कमी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट येऊ शकते.बॅकवॉटर कमी झाल्यास उद्भणार पाणीटंचाईरेतीचा उपसा व शेतीपंपाद्वारे नियमित पाणी उचलले गेल्यास पाणी पुरवठा योजनेच्या ‘जॅकवेल’ पासून बॅकवॉटरचे पाणी दूर जावून मलकापूरकरांसाठीची नळयोजना अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून आठ दिवसांनी का होईना समाधानकारक पाणी पुरवठा होतो; मात्र वॅकवॉटरची पातळी घटल्यास एप्रिल महिन्याच्या अखेरीस शहरवासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यावर वेळीच उपाययोजनांची गरज आहे.पूर्णापात्रातील बॅकवॉटर कमी होणार, याची कल्पना आहे. त्यासाठी आम्ही सतर्क आहोत. त्या धरतीवर रेती उपसा थांबविण्यासाठी व अवैध शेतीपंपावर कारवाईसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला आहे. पाणीटंचाई येऊ न देण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.- अ‍ॅड.हरीश रावळ, नगराध्यक्ष मलकापूर