शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वृक्षतोड; चौकशी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:49 IST

अकोट :अकोट येथील उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस् थानामध्ये अवैधरीत्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल करण्यात आली  आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने पुराव्यांसह उघड  केला.  याबाबत  सावरासावर करीत अकोटचे एसडीओ यांनी जिल्हाधिकार्‍यांना  कत्तल करण्यात आलेल्या सर्व वृक्षांची परवानगी असल्याची ब तावणी करून दिशाभूल केल्याची माहिती समोर आली आहे.  जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर करण्यात आलेल्या  वृक्षांची संख्या व परवानगी घेतलेल्या वृक्षांच्या संख्येचा आढावा  घेतल्यास खरा प्रकार समोर येईल; परंतु कारवाईचे अधिकार  असलेल्या नगर परिषदवर सुद्धा प्रचंड दबाव असल्याने अद्यापही  चौकशीला प्रारंभ करण्यात आला नाही.

ठळक मुद्देअकोट येथील प्रकरणएसडीओंनी केली जिल्हाधिकार्‍यांची दिशाभूल!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट :अकोट येथील उपविभागीय अधिकारी यांच्या निवासस् थानामध्ये अवैधरीत्या हिरव्यागार वृक्षांची कत्तल करण्यात आली  आहे. हा प्रकार ‘लोकमत’ने पुराव्यांसह उघड  केला.  याबाबत  सावरासावर करीत अकोटचे एसडीओ यांनी जिल्हाधिकार्‍यांना  कत्तल करण्यात आलेल्या सर्व वृक्षांची परवानगी असल्याची ब तावणी करून दिशाभूल केल्याची माहिती समोर आली आहे.  जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष घटनास्थळावर करण्यात आलेल्या  वृक्षांची संख्या व परवानगी घेतलेल्या वृक्षांच्या संख्येचा आढावा  घेतल्यास खरा प्रकार समोर येईल; परंतु कारवाईचे अधिकार  असलेल्या नगर परिषदवर सुद्धा प्रचंड दबाव असल्याने अद्यापही  चौकशीला प्रारंभ करण्यात आला नाही.स्थानिक सिंधी कॅम्प परिसरात महसूल विभागाचे उपविभागीय  अधिकारी उदय राजपूत यांचे शासकीय निवासस्थान आहे. या  परिसरातील आठ हिरव्यागार झाडांची कत्तल केल्याची माहिती  सचित्र पुराव्यासह उघडकीस आली. लिलावात नमूद असलेले  झाड अद्यापही कापले नाही. ही वस्तुस्थिती असताना अकोट  एसडीओं यांनी मात्र प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून क र्तव्यदक्ष जिल्हाधिकार्‍यांना परवानगी असल्याचे सांगून  वेळ  मारून नेत दिशाभूल केली. परवानगीपेक्षाही जास्त झाडांची  लिलावधारकाने कटाई केल्याची वस्तुस्थिती असल्याने  सार्वजनिक बांधकाम विभागानेसुद्धा हातवर केले. तर नगर  परिषदकडे चौकशीची व कारवाईची जबाबदारी असताना  त्यांनीसुद्धा एसडीओं यांच्या दबावाखाली साध्या चौकशीलाही  प्रारंभ केला नाही. त्यामुळे शासकीय निवासस्थानीच हिरव्यागार  वृक्षांची कत्तल झाल्याचे सर्वश्रुत असताना, जिल्हाधिकार्‍यांनीसुद्धा  घटनास्थळावर पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेऊन कारवाई  करण्याची अपेक्षा निसर्गप्रेमींमध्ये आहे. दरम्यान,या प्रकरणी  एसडीओ व नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क  करण्याचा प्रयत्न केला असता तो होउ शकला नाही.

परवानगी तीनची, तोडली आठ या ठिकाणी तीन वृक्षतोड करण्याकरिता १ जुलै रोजी सार्वजनिक  बांधकाम विभागाने लिलाव केला. विशेष म्हणजे सदर निवासस् थान हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली आहे;  परंतु या ठिकाणी वृक्ष तोडीची परवानगी मार्च २0१६ मध्ये अकोट  एसडीओ यांनी नगर परिषदेकडे मागितली. जीवित्वास धोका  निर्माण होऊ नये म्हणून नगर परिषदेने दोन वाळलेली झाडे व एक  उंबराचे झाड छाटण्याची परवानगी दिली; परंतु तीन महिन्यांच्या  आत झाडे न तोडता तब्बल १७ महिन्यांनंतर सार्वजनिक बांधकाम  विभागाने तीन झाडांचा लिलाव केला. प्रत्यक्षात मात्र आठ झाडे  कापण्यात आलीत. -