बुलडाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी अडगावकडे जात असलेल्या कारमध्ये विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ, उपनिरीक्षक गणेश नावकार, पोलीस कर्माचारी दत्ता हिंगणे, सुधाकर करवते आदींनी सापळा रचून मंगळवारी रात्री पिंपळखुटा परिसरात कारमध्ये विदेशी दारूची अवैध वाहतूक करताना दोघांना रंगेहाथ पकडले. त्याच्याजवळून विदेशी दारू व कार, असा एकूण दोन लाख तीन हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील आरोपी शेख आरीफ शेख रफिक, शेख अनिस शेख अताउल्ला यांच्याविरुद्ध चान्नी पोलिसांनी दारू बंदीअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (फोटो)
विदेशी दारूची अवैध वाहतूक; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:17 IST