शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चर्चेविना करवाढीचा ठराव अवैध!

By admin | Updated: June 2, 2017 01:53 IST

आंबेडकर यांचा आरोप : आंदोलन छेडणार!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी चर्चा न करताच शहरातील मालमत्ता करवाढीचा घेतलेला ठराव अवैध आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. अवाजवी करवाढीविरोधात भारिप-बमसं शहरात आंदोलन छेडणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.मनपाच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरील मालमत्ता कर वाढीच्या विषयावर चर्चा न करताच ठराव मंजूर करण्यात आला. चर्चा न करता घेतलेला ठराव अवैध असल्याचे सांगत, शहरात ७० हजार मालमत्तांवर कर आकारण्यात येत असून, उर्वरित ३० हजारापेक्षा जास्त मालमतांवर कर आकारणी करण्यात आली नाही, असे त्यांनी सांगितले. कर किती टक्के वाढविण्यात आला, हे सत्ताधाऱ्यांनी आधी स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी करून, महाशिक्षण कर लावण्याचा अधिकार मनपाला नाही, असे ते म्हणाले. करवाढ का आणि कशासाठी करण्यात आली, यासंबंधीची भूमिका जोपर्यंत स्पष्ट होत नाही, तोपर्यंत शहरातील नागरिकांनी अतिरिक्त कर भरू नये, असे आवाहन करीत करवाढीविरोधात भारिप-बमसंच्यावतीने शहरात आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले. शहरातील ज्या मालमत्तांवर अद्याप कर आकारण्यात आला नाही, अशा मालमत्तांवर कर लावल्यास करवाढ करण्याची गरजच राहणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला भारिप-बमसंच्या मनपा गटनेता अ‍ॅड. धनश्री अभ्यंकर (देव), नगरसेवक बबलू जगताप, नगरसेविका किरण बोराखडे, माजी नगरसेवक गजानन गवई, अरुंधती शिरसाट, आसीफ खान, डॉ. प्रसन्नजित गवई, बुद्धरत्न इंगोले उपस्थित होते. न्यायालयात जाणार!सर्वसाधारण सभेत चर्चा न करता करवाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे करवाढीच्या निर्णयाविरोधात भारिप-बमसं न्यायालयात धाव घेणार असल्याचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.‘बॅलेट’द्वारे मतदान; अन्यथा निवडणूक होऊ देणार नाही!जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) ऐवजी मतपत्रिकांद्वारे (बॅलेट) मतदान घेण्यात यावे, अन्यथा निवडणूक होऊ देणार नाही, असा इशाराही अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी दिला.