शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनीवर अवैध जाेडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:15 IST

ऑटाेमुळे वाहतूक विस्कळीत अकोला: शहरातील अत्यंत रहदारीच्या मार्गावर ऑटाेचालकांच्या मनमानीला ऊत आला आहे. सिटी काेतवाली, गांधी रोड, खुले नाट्यगृह ...

ऑटाेमुळे वाहतूक विस्कळीत

अकोला: शहरातील अत्यंत रहदारीच्या मार्गावर ऑटाेचालकांच्या मनमानीला ऊत आला आहे. सिटी काेतवाली, गांधी रोड, खुले नाट्यगृह आदी ठिकाणी थांबा नसताना मनमानीरित्या भर चौकात ऑटाे उभे केले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रस्त्यावर बांधकाम साहित्य

अकोला: जुने शहरातील प्रभाग क्रमांक १० अंतर्गत येणाऱ्या खंडेलवाल महाविद्यालयाजवळ तसेच चिंतामणी नगर ते साेपीनाथ मार्गावर बांधकाम साहित्य रस्त्यावर पडून आहे. यामध्ये रेती, विटा, गिट्टीचा समावेश असूनए अनेक दुचाकी वाहनधारक, सायकलस्वार यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर साहित्य मनपाने त्वरित जप्त करण्याची गरज आहे.

रस्त्यावरील बॅरिकेड हटवा

अकोला: शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या गांधी रोडवर मुख्य चौकात पोलीस प्रशासनाने बॅरिकेड लावले. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खदान पोलीस ठाणेनजीक बॅरिकेड लावले आहेत. या बॅरिकेडमुळे चारचाकी वाहनचालकांना अडथळा निर्माण हाेत आहे. ही बाब पाहता पाेलिसांनी अनावश्यक बॅरिकेड हटविण्याची मागणी हाेत आहे.

रेल्वे स्टेशन चाैकात अस्वच्छता

अकोला: शहरातील रेल्वे स्टेशन चाैकात साफसफाईअभावी प्रचंड घाण व कचरा साचल्याचे दिसून येते. या चौकात मातीचे ढीग व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.

खड्डा ठरतोय जीवघेणा

अकोला: अग्रसेन चाैकातील मुख्य रस्त्याच्या मधाेमध जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाने भला मोठा खड्डा खोदून ठेवला आहे. या मार्गावर अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. हा खड्डा जीवघेणा ठरण्याची चिन्ह पाहता तातडीने बुजविण्याची मागणी होत आहे.

जलवाहिनी फुटली

अकोला: रतनलाल प्लाॅट चाैकात नागरिकांना पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहत आहेत. याचा परिणाम परिसरातील नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावर झाला असून दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आराेग्याला धाेका निर्माण झाला आहे.

ओपन स्पेसमधये अतिक्रमण

अकाेला: शहरात ले-आउटचे निर्माण करताना त्यामध्ये सार्वजनिक वापरासाठी ओपन स्पेस ठेवणे गरजेचे आहे. बहुतांश ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण झाल्याचे आढळून येते. त्यामुळे वयोवृध्द नागरिक, लहान मुलांसाठी अशा खुल्या जागा विकसित करण्याची मागणी हाेत आहे.

पार्किंगची कोंडी कायम

अकोला: शहरात पार्किंगच्या जागेवर उभारलेल्या अतिक्रमणामुळे अकाेलेकरांची कुचंबणा हाेत आहे. प्रशासनाने ही समस्या दूर करण्याची गरज आहे; परंतु तसे हाेत नसल्यामुळे नागरिक त्यांची वाहने रस्त्यावर उभी ठेवत असल्याने वाहतुकीची काेंडी हाेत आहे. वाहतूक शाखा पाेलिसांच्या कारवाईमुळे वाहनधारक वैतागले आहे.

नळांना मीटर; पाण्याचे काय?

अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणी पुरवठा वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ११० कोटींचा निधी मिळाला असून, त्यापैकी ८७ कोटींची कामे अंतिम टप्प्यात आहेत. जुन्या जलवाहिन्यांच्या बदल्यात नवीन जलवाहिन्या टाकल्या जात असून, पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यासाठी नळांना मीटर लावले जात आहे; परंतु दैनंदिन पाणी पुरवठा हाेत नसल्याने अकाेलेकरांमध्ये नाराजी आहे.