शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पातुर्डा घाटातून वाळूचे अवैध उत्खनन

By admin | Updated: May 25, 2017 02:00 IST

महसूल विभागाची डोळे झाक

लोकमत न्यूज नेटवर्कबोरगाव वैराळे : येथून जवळच असलेल्या तेल्हारा तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रात येणाऱ्या तळेगाव पातुर्डा येथील गट क्रमांक ५४, ५५ आणि ६१ या रेतीच्या स्पॉटवरून ३५३३ ब्रास रेती ३५ लाख १५ हजार ३३५ रुपये किंमत ठेवून शासनाने लिलावात ठेवली होती; मात्र या घाटावरील रेती कुणीही लिलावात न घेतल्याने हर्रासी झाली नाही. याच घाटालगत असलेला बाळापूर तालुक्यातील हाता घाट दोन महिन्यांपूर्वी लिलावात गेला होता. दरम्यान, हाता घाटातील संपूर्ण रेती उचलण्यात आली आहे. सध्या आठ ते दहा दिवसांपासून लिलाव न झालेल्या तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा वाळू घाटावरील वाळूचे अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे. यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला चुना लावण्याचे काम वाळू माफिया करीत आहेत.बाळापूर तालुक्यातील हाता हा पूर्णा नदीच्या पात्रातील वाळू घाट दोन महिन्यांपूर्वी ठेकेदाराने लिलावात घेतल्यानंतर दोन महिन्यांत संपूर्ण वाळूचे उत्खनन केले. हाता घाटाला लागूनच असलेल्या तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा या पूर्णा नदीच्या पात्रातील लिलाव न झालेल्या गट क्रमांक ५४, ५५ व ६१ या वाळू घाटात शासनाच्या नियमानुसार ३५३३ ब्रास वाळूचा साठा आहे. त्याची सरकारी किंमत ३५ लाख १५ हजार ३३५ रुपये ठरवून लिलावात ठेवण्यात आली होती; मात्र सदर वाळू घाटावर लिलावात कुणीही बोली न लावल्यामुळे या घाटाचा लिलाव झाला नाही. याच बाबींचा फायदा वाळू माफियांनी उचलणे सुरू केले असून, तळेगाव पातुर्डा या लिलाव न झालेल्या घाटातून मागील आठ ते दहा दिवसांपासून वीस ते पंचवीस वाहनांद्वारे वाळूचे उत्खनन अवैधरीत्या केले जात आहे. या अवैध उत्खनन व वाळूची अवैध वाहतूकप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हाता येथील सरपंच आनंदा दामोदर यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना निवेदनाद्वारे केली आहे. बाळापूर तालुक्यातील हाता घाटावरून मंजूर असलेल्या ब्रासपेक्षा जास्त वाळूचे उत्खनन करण्यासोबत घाटावर वाळू शिल्लक नसताना रॉयल्टी शिल्लक असल्याबाबत तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली असून, या रॉयल्टीवर तेल्हारा तालुक्यातील तळेगाव पातुर्डा लिलाव न झालेल्या घाटावरील वाळू उचलून नेल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबद्दल चौकशी करण्याचे आदेश संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांना देण्यात आले आहेत.- संतोष शिंदे, तहसीलदार, बाळापूर