शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध सावकारी प्रकरण: आरोपी गजाआड

By admin | Updated: May 20, 2017 01:19 IST

अकोला : अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आपातापा रोडवरील रहिवासी असलेल्या अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी संतोष भोसले याला अकोट फैल पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोट फैल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आपातापा रोडवरील रहिवासी असलेल्या अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी संतोष भोसले याला अकोट फैल पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.सावकारी अधिनियमाची योग्य पद्धतीने व प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी गठित करण्यात आलेल्या भरारी पथकाने १३ मे रोजी आपातापा रोड परिसरातील संतोष गोविंद भोसले (रा. संत कबीर नगर) याच्या निवासस्थानी छापा टाकून अवैध सावकारीचा भंडाफोड केला होता. या छाप्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे खरेदीखत, कोरे धनादेश, बँक पासबुकसह अवैध सावकारीबाबतचे दस्तावेज जप्त करण्यात आले होते. तालुका उपनिबंधक कार्यालयात संतोष इंगळे व मनकर्णा पाचपोहे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. इंगळे यांच्या मालकीची आपातापा शिवारामधील पाच एकर शेतीचा संतोष भोसलेंशी व्यवहार झाला होेता. त्यानंतर हा व्यवहार पलटण्यात आला. या तक्रारीनुसार उपनिबंधक कार्यालयाने प्राथमिक व गोपनीय चौकशी केली. त्यानंतर शनिवारी थेट संतोष भोसलेच्या घरावर छापा टाकून दस्तावेज जप्त केले. पंचनामा केल्यानंतर तालुका उपनिबंधक सुरेखा फुपाटे यांच्या तक्रारीवरून अकोट फैल पोलीस ठाण्यात संतोष भोसलेविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियमन २०१४ चे कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी भोसले फरार झाला; मात्र पोलिसांनी त्याचा शोध घेऊन शनिवारी सदर आरोपीस अटक केली असून, शनिवारी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.