शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ५७ पैसे ! 

By संतोष येलकर | Updated: September 30, 2023 19:39 IST

जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली लागवडीयोग्य ९९० गावांची पैसेवारी

अकोला: यंदाच्या खरीप हंगामातील जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशानुसार ३० सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्हयातील लागवडीयोग्य ९९० गावांतील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी सरासरी ५७ पैसे म्हणजेच ५० पैशांपेक्षा जास्त आहे.यंदाच्या पावसाळ्यात प्रारंभी पावसाने महिनाभर उशिराने हजेरी लावल्याने जिल्हयातील खरीप पिकांची पेरणी विलंबाने करण्यात आली.

त्यामध्ये पेरणीचा कालावधी निघून गेल्याने मूग व उडिद या पिकांच्या पेरणीचे प्रमाण अत्यल्प आहे. पावसाने हजेरी लावल्यानंतर गेल्या जुलैमध्ये जिल्हयात सोयाबीन, कपाशी, तूर आदी खरीप पिकांची पेरणी करण्यात आली. दरम्यान, पेरणीनंतर गेल्या २१ व २२ जुलै रोजी जिल्हयात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला होता. त्यामध्ये काही भागांत अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे जिल्हयातील सर्वच नदी व नाल्यांना पूर आले होते. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने, शेतकरी हवालदिल झाला होता. त्यानंतर सद्यस्थितीत खरीप पिकांची स्थिती समाधानकारक असतानाच जिल्हयातील सातही तहसील कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांनुसार जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात आली. त्यानुसार जिल्हयातील लागवडीयोग्य ९९० गावांमधील खरीप पिकांची नजरअंदाज सरासरी पैसेवारी ५७ पैसे म्हणजेच ५० पैशांपेक्षा जास्त आहे.

तालुकाानिहाय गावे अन्

नजरअंदाज पैसेवारीचे वास्तव !तालुका             गावे पैसेवारी

अकोला             १८१ ५५अकोट             १८५            ५७

तेल्हारा             १०६            ५५बाळापूर             १०३             ५६

पातूर             ९४             ६२मूर्तिजापूर १६४             ५७

बार्शिटाकळी १५७             ५८........................................................

कपाशी, सोयाबीनपिकाचा समावेश !

जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने जिल्हयातील कपाशी आणि सोयाबीन या पिकांच्या नजरअंदाज पैसेवारीचा समावेश आहे.सुधारित पैसेवारी

पुढील महिन्यात !जिल्हयातील खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार जिल्हयातील खरीप पिकांची सरासरी पैसेवारी ५७ पैसे असली तरी, जिल्हयातील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी पुढील महिन्यात ३१ आॅक्टोबर रोजी जिल्हा प्रशासनामार्फत जाहीर करण्यात येणार आहे.