शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

गरीब शेतक-यांसाठी ‘आयजी’ सरसावले !

By admin | Updated: September 1, 2016 02:38 IST

शेतक-यांची माहिती घेण्याची पाचही जिल्हय़ातील पोलिसांना सूचना.

सचिन राऊत अकोला, दि. ३१: यवतमाळ येथे एकाच झाडाला शेतकरी पिता-पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची काळीज चिरणारी घटना उघड झाल्यानंतर अमरावती परिक्षेत्रातील पाचही जिल्हय़ातील गरीब आणि गरजू शेतकर्‍यांची माहिती गोळा करण्याच्या सूचना अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी मंगळवारी रात्री पोलीस अधिकार्‍यांना केल्या आहेत. ज्या शेतकर्‍यांच्या मुली लग्नाला आलेल्या आहेत आणि शेतकरी बेताचीच परिस्थितीत जगत असलेल्या शेतकर्‍यांना आता विशेष पोलीस महानिरीक्षकांचा आधार मिळणार आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाने जेरीस आलेल्या शेतकर्‍यांसमोर कुटुंब पोसण्याची प्रश्न निर्माण झाल्याने मोठय़ा प्रमाणात आत्महत्या वाढल्या आहेत. घरचा कर्ता पुरुष गेल्यानंतर शेतकरी कुटुंबीयांसमोर जगण्याचे संकट उभे ठाकते. जगावे किंवा मरावे, अशा संभ्रमावस्थेत असलेल्या शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी पोलीस विभाग सरसावला आहे. अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाय-योजना पोलिसांकडून राबविण्याच्या सूचना पोलीस अधिकार्‍यांना केल्या आहेत. ग्रामीण भागातील पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी आणि पोलीस कर्मचार्‍यांनी शेतकर्‍यांचे सर्वेक्षण करून गरीब शेतकर्‍यांची एक यादी तयार करण्याचे सांगितले आहे. यासोबतच ज्या शेतकर्‍यांच्या मुलांना शिक्षणाचा खर्च जास्त आहे, ज्या शेतकर्‍यांच्या मुलीचे लग्न आहे, अशा शेतकर्‍यांची नोंदणी करून त्याची एक यादी तयार करुन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या मुलींसाठी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचेही प्रयत्न पोलिस विभागाकडून होत आहेत. यासाठी सामाजिक संस्था आणि संघटनांचीही मदत घेतली जाईल.