शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यास धडक देऊन मोटारसायकलस्वाराची मुजोरी!

By admin | Updated: September 19, 2016 02:47 IST

अकोला जूने शहर पोलिसांमध्ये तक्रार.

अकोला, दि. १८: रस्त्यावर खेळणार्‍या चिमुकल्यास धडक देऊन जखमी करणार्‍या मोटारसायकलस्वाराने सहानुभूती न दाखविता उलट चिमुकल्या मुलाच्या आईसोबतच मुजोरी करीत, धमक्या दिल्या आणि मोटारसायकलची नुकसान भरपाई मागण्याचा उपद्व्याप केल्याने जखमी मुलाच्या आईने जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ही घटना रविवारी दुपारी ४.३0 वाजताच्या सुमारास घडली. गीतानगर परिसरातील भरतिया भवन रोडवर शर्विल इंगळे (३) हा चिमुकला खेळत होता. त्याला भरधाव आलेल्या एमएच ३0 एआर ४१८६ क्रमांकाच्या मोटारसायकलने धडक दिली. यात शर्विलच्या डोक्याला जखम झाली. मोटारसायकलस्वारही खाली पडला. यात त्याच्या मोटारसायकलचे नुकसान झाले. मुलाला जखम झाल्यानंतरही त्याच्या आईने सामंजस्याची भूमिका घेतली आणि दवाखान्याच्या खर्चही केला. घटना घडल्यानंतर थोड्या वेळाने पाच ते सहा युवकांना घेऊन महिलेचे घर गाठले आणि महिलेला धमक्या देत मोटारसायकलचे नुकसान झाले असून, त्याची भरपाई देण्याची मागणी केली. त्यामुळे महिला घाबरून गेली. पती घरी नसल्याने, तिने मोटारसायकलस्वार युवकाला नंतर येण्यासाठी सांगितले; परंतु युवक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. अखेर महिलेने पतीला फोन करून बोलावून घेतले आणि नागरिकांसह सायंकाळी जुने शहर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी मोटारसायकल स्वाराविरुद्ध तक्रार नोंदविली आहे.