शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मूलभूत सुविधा हव्या असतील तर कराचा भरणा करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:17 IST

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराची आज राेजी माेठ्या प्रमाणात थकबाकी आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या ...

महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कराची आज राेजी माेठ्या प्रमाणात थकबाकी आहे. मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करण्यात आले हाेते. मालमत्तांची दरवाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाची समस्या निकाली निघण्यासह उत्पन्नात वाढ हाेण्याचा प्रशासनाने दावा केला हाेता. करवाढीच्या निर्णयाला विराेध करीत नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली. तेव्हापासून अकाेलेकरांनी मालमत्ता कर जमा करण्याला आखडता हात घेतला. परिणामी कराच्या उत्पन्नात घसरण आली. कोरोनाचे संकट लक्षात घेता या काळात प्रशासनाने थकीत मालमत्ताधारकांना काेणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्‍हणून अप्रिय कार्यवाही केली नाही. शहरातील नागरिकांना मूलभूत सोई-सुविधा पुरविणेही गरजेचे असून त्यासाठी मनपाला निधीची आवश्यकता आहे. निधीची कमतरता असल्याने मूलभूत सुविधा पुरविणे शक्य नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा हव्या असतील तर तातडीने मालमत्ता कराच्या थकीत रकमेचा भरणा करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

प्रमाणपत्रासाठी पावती अनिवार्य

शहरवासीयांना १ एप्रिलनंतर मूलभूत साेयीसुविधा किंवा कोणतेही प्रमाणपत्र हवे असल्‍यास त्‍यांनी थकीत कराचा भरणा केल्याची पावती दाखवणे प्रशासनाने अनिवार्य केले आहे. यामध्ये बांधकाम परवानगी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्‍म, मृत्‍यू प्रमाणपत्र, वैयक्तिक तक्रारी व सर्व प्रकारचे परवाने असेसमेंट नक्‍कल व इतर दस्‍तऐवजांचा समावेश आहे.