शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पक्षामध्ये बोलता आले असते, तर लेख कशाला लिहिला असता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:42 IST

अकोला : भाजपा सत्तेत आली याचा आनंद आहे, माझा पक्ष असल्यामुळे पुढेही आमची सत्ता राहो, ही आशा व इच्छा आहे; मात्र आज मी सरकारच्या धोरणांविरोधात जाहीरपणे बोलत आहे. अशावेळी अनेकजण प्रश्न विचारतात पार्टीमध्ये हे विषय का मांडले नाही. मला जर पार्टीमध्ये बोलण्यासाठी व्यासपीठ मिळाले असते, तर मी लेख का लिहिला असता अशा शब्दांत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पक्षाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत आपल्या मनातील व्यथा उघड केली.

ठळक मुद्देयशवंत सिन्हा यांचा धडधडीत सवालपक्षातील कार्यप्रणालीवर ठेवले बोट!

अकोला : भाजपा सत्तेत आली याचा आनंद आहे, माझा पक्ष असल्यामुळे पुढेही आमची सत्ता राहो, ही आशा व इच्छा आहे; मात्र आज मी सरकारच्या धोरणांविरोधात जाहीरपणे बोलत आहे. अशावेळी अनेकजण प्रश्न विचारतात पार्टीमध्ये हे विषय का मांडले नाही. मला जर पार्टीमध्ये बोलण्यासाठी व्यासपीठ मिळाले असते, तर मी लेख का लिहिला असता अशा शब्दांत माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी पक्षाच्या कार्यप्रणालीवर बोट ठेवत आपल्या मनातील व्यथा उघड केली.प्रमिलाताई ओक हॉलमध्ये जाहीर व्याख्यान संपल्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आपली संस्कृती ही ज्येष्ठांचा आदर करणारी, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन पुढे मार्गक्रमण करणारी आहे. त्यादृष्टीने विचार केला, तर सध्या भाजपामध्ये ज्येष्ठांचा सन्मान होत नाही, हे मान्यच करावे लागेल. प्रत्येकाची संस्कृती वेगळी असते, जेथे ज्येष्ठांचा सन्मान होत नाही, त्या घरातील मुलांबाबत काय म्हटले जाते, ते आपणास माहीत आहे, असा टोला लगावत त्यांनी हा संस्कृतीशी निगडित प्रश्न आहे. पार्टीच्या नियमांचा नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरात केला.  सरकारच्या अनेक धोरणांमध्ये विसंगती आहे, जीएसटीमध्ये आमूलाग्र बदल करावा लागेल, तरच हा गुड अँण्ड सिम्पल टॅक्स होईल, असे स्पष्ट करतानाच कोणतेही आर्थिक धोरण स्वीकारताना त्याचा फायदा-तोटा काय होईल, हे सांगावे लागते. सरकारमध्ये सध्या खूप लायक लोक बसलेले आहेत, त्यांनी जीएसटीचा फायदा सांगावा, असे आव्हान त्यांनी दिले. शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प असलाच पाहिजे, हा आग्रह नाही; मात्र शेतीचे निश्‍चित असे आर्थिक धोरण आवश्यक आहे. या धोरणांना नशिबाचीही साथ लागते, मान्सूनवर या धोरणांचे यश-अपयश अवलंबून असते, त्यामुळे या सरकारने अशा धोरणांचा पुनर्विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वाढती महागाई व बेरोजगारी हे जिव्हाळय़ाचे प्रश्न आहेत, त्यांची सोडवणूक झाल्याशिवाय लोकांचा विश्‍वास कमावता येत नाही. या मुद्यावर भाजपा सरकार अपयशी ठरल्याचीही टीका त्यांनी केली. 

पार्टीचे नियम बदलत राहतातकम्युनिस्ट पार्टीमध्ये राज्यसभा सदस्यत्व देण्यासाठी केवळ दोन टर्मची अट आहे, तिचे कसोशीने पालन केले जाते. सीताराम येचुरीसारख्या ज्येष्ठ व प्रभावी नेत्यालाही तिसरी टर्म मिळाली नाही. आमच्या पक्षानेही असेच धोरण स्वीकारले व दोन ज्येष्ठ नेत्यांना राज्यसभेवर संधी दिली नाही. त्यानंतर मात्र हा नियम बदलला व  आता चार टर्मवाले नेतेही आमच्याच पक्षात आहेत, त्यामुळे पक्षाचे नियम हे बदलते राहतात, अशा शब्दांत सिन्हा यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.-

टॅग्स :Politicsराजकारण