शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्च न केल्यास स्वच्छ सर्वेक्षणाचे गुण होतील कमी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 13:26 IST

३१ मार्चपूर्वी विकास कामांवर निधी खर्च न केल्यास स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ मधील गुण कमी होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

अकोला: महापालिकांना वितरित करण्यात आलेल्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेसह नागरी दलित वस्ती योजना, दलितेतर योजनेसाठी प्राप्त निधीतून विकास कामे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश नगरविकास विभागाने जारी केले आहेत. ३१ मार्चपूर्वी विकास कामांवर निधी खर्च न केल्यास स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ मधील गुण कमी होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.महापालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी राज्य शासनाकडून दरवर्षी कोट्यवधींचे अनुदान दिले जाते. यामध्ये प्रामुख्याने सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, नागरी दलित वस्ती सुधार योजना, दलितेतर योजना, रमाई घरकुल आवास योजनेचा समावेश आहे. यामध्ये रस्ते, नाल्या, पथदिवे, सामाजिक सभागृह, पाणी पुरवठा योजना, उद्यानांचे सौंदर्यीकरण आदी विकास कामांचा समावेश आहे. प्राप्त निधीत महापालिका प्रशासनाला त्यांचा आर्थिक हिस्सा जमा करावा लागतो. यातील सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, दलितेतर योजना तसेच रमाई घरकुल आवास योजनेचा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त होतो. सदर निधीत महापालिकेला आर्थिक हिस्सा जमा करणे क्रमप्राप्त असून, त्यानंतरच मनपा प्रशासनाकडून विकास कामांचे प्रस्ताव मागितले जातात. नगरसेवकांकडून विकास कामांची यादी मिळाल्यानंतर बांधकाम विभागाकडून प्रस्तावांची छाननी केल्या जात असली, तरी या सर्व प्रक्रियेला विलंब होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. आर्थिक वर्ष संपल्यानंतरही विकास कामांचे कार्यादेश (वर्कआॅर्डर) जारी होत नसल्याने अखर्चित निधी शासनाकडे परत पाठविण्याची महापालिकांवर नामुश्की ओढवते. या सर्व बाबी लक्षात घेता विकास कामांसाठी दिले जाणारे अनुदान ३१ मार्च २०१९ पर्यंत खर्च न केल्यास स्वच्छ सर्वेक्षण-२०१९ अंतर्गत केल्या जाणाऱ्या तपासणीदरम्यान गुण कमी होणार असल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे.पुनर्मूल्यांकन केले; वसुली ठप्प!‘जीआयएस’प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करणे, मालमत्ता कर वसुली ९० टक्के केल्यानंतरच स्वायत्त संस्थांच्या गुणानुक्रमात वाढ होणार आहे. ‘ड’ वर्ग महापालिकांनी मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केले असले तरी वसुली ३० टक्क्यांपेक्षा अधिक नसल्याची परिस्थिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान