शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

परिस्थितीला बदलू शकत असाल, तर बदलून टाका - सतीश फडके

By admin | Updated: October 9, 2015 01:58 IST

विदर्भस्तरीय मुख्याध्यापक संघाची कार्यशाळेचा समारोपीय कार्यक्रम उत्साहात.

अकोला: शिक्षण क्षेत्रातील परिस्थितीवर तक्रारी करू नका. परिस्थितीला बदलू शकत असाल, तर बदलून टाका अन्यथा परिस्थितीचा स्वीकार करा, असे मत प्रा.सतीश फडके यांनी व्यक्त केले. हिंगणा फाटास्थित प्रभात किड्स शाळेत गुरुवारी आयोजित विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या विदर्भस्तरीय कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य मुख्याध्यापक संघटनेचे राज्याध्यक्ष मारोतराव खेडेकर होते. तर मेस्टा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.गजानन नारे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिरकड, विलास भारसाकळे, नरेंद्र वाळके, अशोक पारधी, प्रवीणा शहा आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन खेडेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रा. फडके यांनी उपस्थित मुख्याध्यापकांच्या सामान्य जीवनातील उदाहरण देऊन त्यांना परिस्थिती बदलण्याचे आवाहन केले. शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम आणि त्यातून उद्भवणार्‍या समस्यांमुळे मुख्याध्यापकांवर ताण येतो. त्यामुळे मुख्याध्यापकांना ही परिस्थिती बदलणे शक्य असेल तर ती तत्काळ बदलून टाका किंवा त्या परिस्थितीला स्वीकारून परिस्थितीनुसार जीवन जगण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला. वेळ ही पैशांहून मौल्यवान असल्याने आपल्या वेळेचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी सचिन बुरघाटे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश जगताप यांनी तर सूत्रसंचालन विदर्भ मुख्याध्यापक संघाच्या उपाध्यक्ष, नागपूर, मंदा उमाटे यांनी केले. आभार प्रदर्शन बळीराम झामरे यांनी मानले.