शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

बहुमत नसेल तर ‘ब्लॅकमेलिंग’ होते!

By admin | Updated: February 18, 2017 02:40 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन; विकासाच्या मुद्यावर सरकार नेहमीच पाठीशी

अकोला, दि. १७- शहराच्या विकासाचे 'व्हिजन' पूर्ण करावयाचे असेल, तर महापालिके च्या निवडणुकीत बहुमत द्या. अन्यथा सत्ता स्थापन करताना ह्यब्लॅकमेलिंगह्णचा सामना करावा लागतो. त्याचा परिणाम विकास कामांवर होतो त्यामुळे बहूमतासह महापालिका ताब्यात सोपवा, तुमच्या स्वप्नातले शहर घडवण्यासाठी पाहिजे तेवढा निधी देतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शुक्रवारी स्थानिक अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेस संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, कधीकाळी नगर परिषदेच्या कार्यकाळात अकोला शहराचा नावलौकिक संपूर्ण राज्यात होता. पुढे काँग्रेसच्या राजवटीत शहराचे गतवैभव लोप पावले. भारतीय जनता पक्षाने मात्र उण्यापुर्‍या अडीच वर्षांच्या सत्तेच्या कालावधीत शहरामध्ये कोट्यवधींची विकास कामे केली आहेत. शहराला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी भाजप हाच सशक्त पर्याय असल्याचे सांगून, शहराचा विकास कसा करायचा, याची जाण पक्षाच्या नेतृत्वाला असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्यअमृतह्ण योजनेंतर्गत शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी २५४ कोटींचा निधी मंजूर केला असून, पहिल्या टप्प्यातील ११0 कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा केले आहेत. योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात वान धरणाच्या पाण्याचा शहरासाठी विचार केला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. शहरातील सांडपाणी थेट नदी पात्रात सोडले जाते. नाले-गटारांमधील घाण पाण्यामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. यासाठी आपणच दोषी आहोत. यामुळे रोगराई पसरण्यास हातभार लागत असून, दरवर्षी निर्माण होणारे साथीचे रोग आपल्यामुळेच तयार झाले आहेत. यावर ठोस उपाय म्हणून भूमिगत गटार योजनेचा समावेश ह्यअमृतह्ण योजनेत करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करता येईल. ते पाणी उद्योगांसाठी वापरता येणार असून, पाणीपुरवठा योजनेनंतर, भूमिगतच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूरप्रमाणो अकोल्यातही २४ तास पाणी पुरवठा करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांनाच नव्हे तर ज्यांच्याकडे हक्काचे घर नसेल त्या सर्वांना २0२२ पर्यंत घरे बांधून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापूर्वीच्या योजना फसव्या होत्या. मर्जीतल्या लोकांची तोंडे पाहून घरे दिली जात होती, असा चिमटा मुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्कालीन राज्य सरकारला काढला. यावेळी व्यासपीठावर कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, खा. संजय धोत्रे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर,आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरीष पिंपळे, महापौर उज्ज्वला देशमुख, प्रदेश संगठन मंत्री रामदास आंबटकर, जिल्हाध्यक्ष तेजराव पाटील, महानगराध्यक्ष किशोर पाटील मांगटे, विजय अग्रवाल, अकोट नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे, तेल्हारा नगराध्यक्ष जयश्री पुंडकर, डॉ. अशोक ओळंबे उपस्थित होते. आ. शर्मा, सावरकरांचे कौतुकलालाजी (आ. गोवर्धन शर्मा) कमी बोलतात; मात्र विकास कामांप्रती त्यांची 'अँक्शन' जास्त असते. त्यामुळे त्यांना प्रचंड निधी दिला असून पुढेही भविष्यात देत राहील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शहरालगतच्या गावांचा मनपाच्या मूलभूत सोयी-सुविधांवर ताण पडत असल्याने महापालिका क्षेत्राची हद्दवाढ करण्याचा प्रस्ताव आमदार रणधीर सावरकर यांनी मांडला होता. विकासासाठी हद्दवाढ आवश्यक असल्याची भूमिका आ. सावरकरांनी स्पष्ट केल्यानंतर हद्दवाढीचा निर्णय घेतला. नवीन भागासाठी २0 कोटींचा निधी दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. खासदार, राज्याचे नगर विकास राज्यमंत्री व आमदारांचे मस्त 'कॉम्बिनेशन'आहे. असा योग पुन्हा येणे नाही, त्यामुळे विकासाचे व्हिजन तयार ठेवा आणि निधी घेऊन जा, असा सल्ला यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला. नामदार-खासदारांनी दिली विजयाची ग्वाही !गतवेळी पक्षाचे १८ नगरसेवक विजयी झाले होते. यंदा आम्ही ४५ चा आकडा पार करू, असा विश्‍वास खा. संजय धोत्रे यांनी व्यक्त केला. आम्ही केवळ माध्यम आहोत, ह्यमेन स्वीचह्णतुमच्याकडेच असल्याचे खा. धोत्रे यांनी मुख्यमंत्र्यांक डे पाहून सांगितले. जिल्ह्यातील पाचपैकी तीन नगरपालिका, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बहुमताने जिंकल्यानंतर आता महापालिका निवडणूकही निर्भेळ बहुमताने जिंकून देतो, असा दावा पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी यावेळी केला.