मूर्तिजापूर : चांगल्या कंपन्या बाजार समितीत उतराव्यात व थेट बाजार समिती निर्यात केंद्रासोबत जोडल्या गेली म्हणजे बाजार समितीसोबत शेतकऱ्यांचही भलं होईल, त्यासाठी लागणारे वार्षिक नियोजन केल्यास डीपीसीतून दरवर्षी २ कोटी आर्थिक सहकार्य करण्यासाठी मी तत्पर असल्याचे आश्वासन पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी बाजर समिती यार्ड मधिल दुकान समूह व गोडाऊन उद्घाटन प्रसंगी दिले. १८९९ मध्ये कापूस व्यवहार, १९५७ मध्ये धान्यबाजार व १९९३ मध्ये गुरांचा बाजार सुरू करणाऱ्या, १६२ गावे समाविष्ट असणाऱ्या व नविन वर्गवारीत 'अ' वर्गात गेलेल्या या बाजार समितीच्या आजवरच्या शेतकरी कल्याणाच्या ऐतिहासिक कार्याची माहिती ॲड. भैयासाहेब तिडके यांनी अध्यक्षीय भाषणातून दिली. शेतकरी, खरीददार व इतरांच्या सुविधेसाठी बाजार समितीच्या आवारात पेट्रोल पंप निर्माणाधीन असल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या कुठल्याही अडचणीत त्यांची सोय करून देण्याचा कारभार ही बाजार समिती चालवीत असल्याचेही त्यांनी नमुद केले. सूत्रसंचालन कृउबास संचालक दिवाकर गावंडे यांनी केले. यावेळी माजी आमदार, ज्येष्ठ सहकार नेते तथा कृउबास सभापती ॲड.भैयासाहेब तिडके अध्यक्षस्थानी होते. उपसभापती गणेशराव महल्ले, अप्पू तिडके, राजु कांबे, नरेश विल्लेकर, राम कोरडे, जगदीश मारोटकर, श्रीकृष्ण बोळे, सुनिल पवार, सागर कोरडे, संजय नाईक, बबन डाबेराव, विनायक गुल्हाने, कुमार कांबे, विष्णू लोडम, संतोष इंगोले, दिनकर इसळ, बंडू पाटील लांडे, सर्व कृउबास संचालक, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, प्रहार चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
नियोजन असेल तर मूर्तिजापूर बाजार समितीला दोन कोटी - बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 8:15 PM