अकोला: कोरोनाचा संसर्ग झपटयाने पसरत असताना आता घरोघरी ऑक्सिमीटर दिसू लागले आहेत. एकाच हाताच्या पाचही बोटांना वेगवेगळे ऑक्सिमीटर लावल्यावर वेगवेगळे आकडे दिसत असल्याचे फोटो आणिा माहिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे नेमका कशा प्रकारचा ऑक्सिमीटर वापरावा, याबाबत सामान्यांमध्ये संभ्रम पाहायला मिळत आहे. आपल्या रक्तातील ऑक्सिजन प्रमाण मोजण्यासाठी ऑक्सिमीटर उपयोग होतो. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये फुप्फुसाला संसर्ग झाल्याने श्वास घ्यायला त्रास होतो आणि शरीरातील ऑक्सिजन पातळीही खालावते. पल्स ऑक्सिमीटरमध्ये बोट ठेवल्यानंतर रक्तातील ऑक्सिजनची मात्रा मोजली जाते. त्याचप्रमाणे प्लसरेट अर्थात आपल्या ह्दयाच्या ठोक्यांचे रीडिंगदेखील मिळते. कोरोनाबाधित रुग्णांना दर दोन तासांनी ऑक्सिजनची मात्रा तपासण्याचा सल्ला दिला जातो. रक्तातील आॅक्सिजनचे प्रमाण ९० टक्क्यांहुन जास्त असले पाहिजे. असे वैद्यकतज्ञांचे म्हणणे आहे. ऑक्सिजनची मात्रा ९० पेक्षा खालावल्यास आणिा बराच वेळ तशीच राहिल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे.
ऑक्सीजन ९० च्या खाली आला तर डॉक्टरकडे जा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 17:44 IST