शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शौचालय नाही तर सदस्यत्व रद्द

By admin | Updated: December 12, 2014 23:52 IST

अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांसाठी शासनाचे आदेश.

विवेक चांदूरकर अकोला: महसूल कर्मचार्‍यांनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्यांनाही शौचालय अनिवार्य करण्यात आले असून, शौचालय नसल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे. १५ डिसेंबरपयर्ंत या सदस्यांना शौचालय असल्याचे व त्याचा वापर करीत असल्याचे प्रमाणपत्र शासनाकडे सादर करावे लागणार आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालयांचा वापर वाढावा याकरिता शासन सरसावले आहे. यापूर्वीही सर्व कर्मचार्‍यांना शौचालय अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानंतर आता लोकप्रतिनिधींकडे शासने वळले आहे. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांना शौचालय बांधणे व त्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महसूल आयुक्तांनी लोकप्रतिनिधींनाही शौचालय अनिवार्य करण्याचे आदेश जिल्हा परिषद सीईओंना दिले आहेत. सीईओंनी तसे पत्र संबंधित पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांना दिले. स्वच्छ अभियानांतर्गत वैयक्तीक शौचालयांची व्याप्ती वाढविण्याकरिता महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियमन १९८५ मधील कलम १४ (अ ज-५) मध्ये ग्रामसधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार शौचालय नसलेले तसेच शौचालयांचा वापर करीत नसलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद सदस्यांना ग्रामपंचायतचे ग्रामसेवक व सरपंचाकडून शौचालय असल्याचे पत्र लिहून पंचायत समितीत सादर करावे लागणार आहे. *निवडणूकीच्या वेळीच्या हमीपत्राची विश्‍वासार्हाता नाही जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीच्या निवडणुकीच्या वेळी जिल्हा परिषद तसेच ग्राम पंचायत सदस्य घरात शौचालय असल्याचे पत्र देत असतात. मात्र, त्यानंतरही शौचालयांचा वापर करीत नाही. त्यामुळे १५ डिसेंबरपर्यंत पुन्हा त्यांना सरपंच व ग्रामसेवकाच्या दाखल्यासह शौचालय असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे.