शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वसुली न केल्यास ग्रा.पं. बरखास्त

By admin | Updated: February 28, 2017 01:58 IST

जिल्हा परिषद; सीईओंनी दिले गटविकास अधिका-यांना निर्देश

अकोला, दि. २७- ग्रामपंचायतीकडे थकीत असलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची रक्कम वसूल न झाल्यास त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचासह पदाधिकारी, सचिवांवर कायद्यानुसार बरखास्तीचा प्रस्ताव गटविकास अधिकार्‍यांनी तातडीने सादर करावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी सोमवारी बैठकीत दिले. प्रत्येक तालुक्यातून दरमहा किमान दहा ते बारा लाख रुपये वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ८४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून असलेल्या ८८ गावांतील पाणीपट्टी वसुली अत्यल्प आहे. या गावांतील पाणीपट्टी वसुलीसाठी सोमवारी दुपारी जिल्हा परिषद सभागृहात बैठक घेण्यात आली. पाणीकराची किमान ७0 टक्के वसुली न झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला जाणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकार्‍यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ८४ खेडी योजनेतून ८८ गावांना पुरवठा केला जातो. त्या गावांची वसुली केवळ १.४0 टक्के आहे. त्यामध्ये अकोट तालुक्यातील ६८, अकोला तालुक्यातील नऊ आणि तेल्हारा तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. त्या गावांतील वसुली करण्यासाठी आता पथके गठित केली जाणार आहेत. त्या पथकांकडून थकीत रक्कम वसुलीसाठी गावांतील नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेतली जाणार आहे. सोबतच सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सचिवांनीही पाणीपट्टी वसुलीसाठी प्रयत्न करण्याचे सांगण्यात आले. त्यांनी तसे न केल्यास ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ३९ (१) नुसार कारवाईचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे. वसुलीसाठी रोजंदारीवर कामगार घेण्याची सूटही देण्यात आली आहे. यावेळी उपस्थित सरपंच, सचिव, गटविकास अधिकार्‍यांनी वसुली करण्यासाठी सहमती दर्शवली. बैठकीत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार, उपअभियंता तिडके, अकोल्याचे गटविकास अधिकारी जी.के. वेले, श्रीकांत फडके, कालिदास तापी यांच्यासह विस्तार अधिकारी उपस्थित होते. आज सभाजिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा उद्या मंगळवारी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेसाठी विषयपत्रिकेवर विषय नसल्याने ऐनवेळीच्या विषयावरून सभेतील कामकाज ठरणार आहे.