शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जॉब कार्ड ग्रामपंचायतकडे ठेवल्यास फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:27 IST

जॉब कार्ड कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचाय तमध्ये ठेवू नये, मजुरांनाच ते द्यावे, तसे न झाल्यास फौजदारी  कारवाई करण्याचे आदेश रोजगार हमी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देगैरवापराचे प्रमाण वाढल्याने होणार कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रोजगार हमी योजनेच्या कामासाठी मजूर नोंदणीचे  जॉब कार्ड ग्रामपंचायतमध्येच ठेवून त्याआधारे कामावर मजूर  दाखवण्याचे प्रकार सातत्याने घडले आहेत. यापुढे ते प्रकार  टाळण्यासाठी जॉब कार्ड कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचाय तमध्ये ठेवू नये, मजुरांनाच ते द्यावे, तसे न झाल्यास फौजदारी  कारवाई करण्याचे आदेश रोजगार हमी विभागाचे सचिव एकना थ डवले यांनी दिले आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियम २00५  मधील तरतुदींनुसार जॉब कार्ड मजुरांकडे ठेवण्याचे बंधनकारक  आहे. त्यानुसार कोणत्याही कामादरम्यान मजुरांचे जॉब कार्ड  त्यांच्याकडेच ठेवावे लागते. दरम्यान, केंद्र शासनाने २0१७-१८  मध्ये लागू केलेल्या नियमानुसार कोणत्याही विशिष्ट  कारणाशिवाय मजुरांचे जॉब कार्ड ग्रामपंचायत कार्यालयात  आढळल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले  आहेत. विशेष म्हणजे, याबाबतच्या सूचना सर्व संबंधितांना  दिल्यानंतरही मोठय़ा प्रमाणात मजुरांचे जॉब कार्ड ग्रामपंचाय तींमध्येच पडून असल्याची माहिती आहे. ही बाब रोजगार हमी  योजना विभागाच्याही निदर्शनास आली आहे. त्यामुळे मजुरांना  द्यावे लागणारे जॉब कार्ड ग्रामपंचायत कार्यालयात ठेवल्यास  संबंधितांच्या अडचणी वाढू शकतात. ही बाब सर्व संबंधितांवर  कारवाईसाठी पुरेशी आहे. त्यातच या प्रकारामुळे मजुरांनी किती  दिवस काम केले, त्यांना किती मजुरी मिळाली, याबाबतची  माहितीही मजुरांना मिळत नाही. त्यांच्या नावावर इतरांनीच मजुरी  काढणे, कामावर नसताना दाखवणे, हे प्रकार घडत असल्याने  आता ग्रामपंचायतींमध्ये जॉब कार्ड आढळल्यास थेट फोजदारी  कारवाई करण्याचे आदेश सचिव एकनाथ डवले यांनी दिले  आहेत. 

पारदर्शकतेला हरताळग्रामपंचायतींमध्ये असलेले ग्राम रोजगारसेवक, सरपंच,  ग्रामसेवकांकडून काही प्रकार मुद्दामपणे केले जातात. त्यातून  संबंधित यंत्रणेशी हातमिळवणी करून कामावर प्रत्यक्ष  नसलेल्या मजुरांच्या नावे मजुरीची रक्कम काढली जाते.  संगनमताने हे प्रकार ग्रामपंचायतींमध्ये जॉब कार्ड ठेवल्यानेच  घडतात. आता फौजदारी कारवाईच्या भीतीने गावातील सर्वांनाच  जॉब कार्डचे वाटप करावे लागणार आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत