शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

कृषी पंपांचे कनेक्शन तोडाल तर खबरदार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 02:10 IST

शिर्ला : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणामुळे देशोधडीला लागलेल्या शेतकर्‍यांच्या कृषी पंपांची वीज कापाल तर खबरदार, असा इशारा आमदार बळीराम सिरस्कार यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना १५ नोव्हेंबर रोजी दिला. ते पातूर तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांच्या आक्रोश मोर्चात मार्गदर्शन करीत होते.

ठळक मुद्देशेतकरी आक्रोश मोर्चात बळीराम सिरस्कारांनी दिला महावितरणला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्ला : केंद्र व राज्य शासनाच्या धोरणामुळे देशोधडीला लागलेल्या शेतकर्‍यांच्या कृषी पंपांची वीज कापाल तर खबरदार, असा इशारा आमदार बळीराम सिरस्कार यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना १५ नोव्हेंबर रोजी दिला. ते पातूर तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांच्या आक्रोश मोर्चात मार्गदर्शन करीत होते.      भारिप बहुजन महासंघाच्यावतीने आमदार बळीराम सिरस्कार यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी स्थानिक संभाजी चौकापासून पातूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेला. तहसील कार्यालयासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी तालुका अध्यक्ष अँड. किरण सरदार, कार्याध्यक्ष काशीराम साबळे, महिला आघाडी अध्यक्ष प्रतिभा अवचार, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, आसिफ खान, राजुमिया देशमुख, शोभा शेळके, दीपक इंगळे आदींनी यावेळी भाषणांमधून सरकारचे वाभाडे काढले आणि सरकारच्या धोरणानुसार शेतकरी कसा मरणासन्न अवस्थेत पोहोचला, ते सांगितले. यावेळी सरकारने फसवी कर्जमाफी थांबवून संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, कृषी पंपांना १२ तास वीज पुरवठा करावा, संपूर्ण वीज बिल माफ करावे, सोयाबीनला पाच हजार, तुरीला सात हजार व कापसाला नऊ हजार असा शेतमालाच्या उत्पादन खर्चावर भाव मिळावा, अकोला जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकरी घाम गाळून पिकवित असलेल्या शेतमालाची ऑनलाइन विक्री थांबविण्यात यावी, क्रीमी लेयरमधून ओबीसीमधील काही जाती वगळण्याची मागासवर्ग ओबीसी आयोगाने केलेली शिफारस रद्द करावी, जिल्ह्यातील खड्डेमय रस्ते दुरुस्त करावेत, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करावी, त्याबरोबरच ग्रामीण भागातील लोकांना घरकुल बांधण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन आ. सिरस्कार यांनी तहसीलदार डॉ. आर. जी. पुरी यांना सादर करून ते शासनापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.यावेळी  कार्याध्यक्ष काशीराम साबळे, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष प्रतिभा अवचार, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, महिला बालकल्याण सभापती देवका पातोंड, जि. प. सदस्य शोभा शेळके, आसिफ खान, राजूमिया देशमुख, शैलेंद्र सोनोने, सम्राट सुरवाडे, जीवन डिगे, विकास सदांशिव, जीवन उपर्वट, आकाश वाहुरवाघ, सुनील सदाशिव, किशोर तेलगोटे, अँड. किरण सरदार, सुनील पाटकर, सविता धाडसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Baliram Siraskarबळीराम सिरस्कार