शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्याची ‘प्रत्यंचा’ ताणलीच गेली तर

By admin | Updated: September 17, 2014 00:49 IST

महायुती धोक्यात : बुलडाण्यातही भाजपाचीही शतप्रतिशतची तयारी.

राजेश शेगोकार / बुलडाणाआघाडीपेक्षाही विधानसभेत महायुती दमदार असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात महायुतीमधील ताणलेल्या संबधांचे पडसाद घुमू लागले आहेत. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यातील सातपैकी तीन जागा सेना तर चार जागा भाजपाने लढविल्या. दोन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन आमदार निवडून आल्याने महायुतीच्या पारडयात मतदारांनी समसमान यश टाकल्याचे दिसत आहे. व हेच चित्र गेल्या दशकापासुन कायम आहे. त्यामुळे आता धनुष्याच्या ह्यप्रत्यंचह्ण ताणला तर कमळही सर्वत्र फुलण्यास तयार असल्याचा सुर भाजपाच्या गोटातुन ऐकायला मिळत आहे. महायुतीमध्ये होऊ घातलेल्या विधानसभेच्या जागा वाटपावरून बेबनाव निर्माण होऊन त्यातून युती तुटण्याची शक्यता निर्माण झाल्याने बुलडाण्यातही त्याची चाचपणी सुरू झाली आहे. ज्या मतदार संघात वर्षानुवर्ष सेनेचा उमेदवार दिला आहे तेथे भाजपाची तर भाजपाचा उमेदवार असलेल्या ठिकाणी सेनेची वाढ खुंटली आहे. एकमेकांच्या पक्षांना आपआपल्या प्रभाव क्षेत्रात बोन्साय करण्याची ही परंपरा सतत दक्षतेने पाळल्या गेल्यामुळे युतीधर्माच्या नावाखाली कार्यकर्त्यांची मात्र कुचंबना झाली आहे. बुलडाणा, सिंदखेडराजा व मेहकर या मतदारसंघात सेनेचा उमेदवार दिला जा तो. या तिन्ही मतदार संघात भाजपाची स्थिती गंभीर अशीच आहे. मात्र आपल्या निष्ठावान कार्यक र्त्यांच्या रूपाने भाजपा आता कामाला लागली आहे. मोदी लाट अजून ओसरली नाही, संघही सक्रीय झाला आहे, अशा अशावादावर ह्यकमळह्ण फुलविण्याचे स्वप्न भाजपा पाहत असल्याने महायुतीच्या ताणलेल्या सबंधामध्ये या मतदार संघातील मित्रपक्षाकडून दुखावलेले कार्यकर्ते आशावादी झाले आहेत. याउलट चिखली, जळगाव जामोद व मलकापूर तसेच खामगाव मतदार संघात भाजपाचा उमदेवार असतानाही सेनेने आपले अस्तीत्व वेळोवेळी दाखवूनच दिले आहे. त्यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपाने सेनेला बाजुला ठेवत सत्ता हस्तगत करण्याची अनेक उदाहरणे येथे दिसुन आली आहेत. या दोन्ही पक्षातील वर्चस्वाच्या लढाईला आता ताणलेल्या सबंधाचे खतपाणी मिळत आहे. उद्या युती तुटली तर उमेदवारीसाठी लागणारे जाती-पातीचे निकष पाहून इच्छुकांना आ तापासुनच उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत.