शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ महाविद्यालयांची मान्यता भौतिक सुविधा नसल्यास रद्द!

By admin | Updated: April 27, 2017 01:23 IST

लवकरच कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी: प्रवेश प्रक्रियेपूर्वीच सुविधा उपलब्ध करा!

अकोला: कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध नसल्यास, त्या महाविद्यालयांना अकरावी वर्गासाठी प्रवेशित विद्यार्थी देण्यास येणार नाहीत आणि त्यांची मान्यता रद्द करण्यासंदर्भातील प्रस्तावसुद्धा शिक्षण संचालकांकडे पाठविण्याचा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद यांनी दिला आहे. अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा उपलब्ध कराव्यात, असा आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला. शैक्षणिक वर्ष २0१७ व १८ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी वर्गासाठी आॅनलाइन किंवा केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यासंदर्भात नियोजन सुरू आहे. महापालिका क्षेत्रातील अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यीत कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये भौतिक सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहे, शुद्ध पाण्याची व्यवस्था, बसण्यासाठी टेबल, खुर्च्या, ग्रंथालय, पाठ्यपुस्तकांची सुविधा नाही; परंतु सुविधांच्या नावाखाली अपप्रचार करून कनिष्ठ महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश देतात; परंतु त्यांना भौतिक सुविधा देण्यात येत नाहीत. शिक्षण हक्क कायदा २00९ नुसार विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा देणे बंधनकारक आहे; परंतु कनिष्ठ महाविद्यालये त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी दोन महिन्यांच्या सुट्टीच्या कालावधीत कनिष्ठ महाविद्यालयांनी आपल्या येथे भौतिक सुविधा उपलब्ध करून घ्याव्यात. त्यासाठी उपशिक्षणाधिकाऱ्यांची समिती मे महिन्यात कनिष्ठ महाविद्यालयातील भौतिक सुविधांची तपासणी करणार आहे. अकरावी प्रवेश प्रकियेपूर्वी भौतिक सुविधा उपलब्ध न करणाऱ्या महाविद्यालयांना अकरावी वर्गातील प्रवेशासाठी विद्यार्थी देण्याची परवानगी नाकारण्यात येईल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यासंदर्भातसुद्धा शिक्षण संचालकांकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांनी दिला आहे. शिक्षण विभागाने अनेकदा कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी केली. तपासणीमध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थितीसह भौतिक सुविधा नसल्याचेसुद्धा समोर आले आहे. त्यामुळे यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यापूर्वी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील भौतिक सुविधा समितीमार्फत तपासणी करण्यात येईल. - प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद.