शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे देणार अपंगांना ओळखपत्र

By admin | Updated: June 2, 2015 01:32 IST

ओळखपत्रावर राहणार यूनिक आयडी : इंटरनेटवरून बुक करता येईल तिकीट.

राम देशपांडे / अकोला : अपंगांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने लवकरच रेल्वे प्रशासन ओळखपत्र वितरित करणार आहे. या सुविधेमुळे ओळखपत्र प्राप्त अपंग व्यक्तींना तिकिटासाठी धक्के खात रांगेत उभे रहावे लागणार नाही. ओळखपत्रावर अंकित यूनिक आयडीच्या माध्यमातून त्यांना थेट इंटरनेटवरून तिकीट बुक करण्याची सुविधा मिळणार आहे. कुठल्याही कारणाने अपंगत्व आलेल्या व्यक्तींना रेल्वेने प्रवास करताना कुणाचा आधार घेण्याची गरज पडू नये, त्यांनी आत्मनिर्भर व्हावे, हा उद्देश समोर ठेवून रेल्वे प्रशासन लवकरच अपंगांना ओळखपत्र वितरित करणार आहे. रेल्वेने प्रवास करणार्‍या अपंग व्यक्तींना सध्याच्या घटकेला तिकीट काढताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करून प्रवास भाड्यात सवलत मिळविण्यासाठी एक विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागतो. विविध मार्गांनी बनावट अपंग प्रमाणपत्रे तयार करून अनेकजण रेल्वेची लुबाडणूक करीत असल्याची प्रकरणे प्रत्येक विभागात निष्पन्न झाली आहेत. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. त्यासाठी रेल्वे प्रशासनाच्यावतीने लवकरच अपंग व्यक्तींना त्यांचा स्वत:चा फोटो व यूनिक क्रमांक असलेले ओळखपत्रे वितरित केली जाणार आहेत. ओळखपत्र प्राप्त करू इच्छिणार्‍या अपंग व्यक्तीच्या कागदपत्रांची पडताळणी विभागीय रेल्वे व्यस्थापकांमार्फत केली जाणार आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच अपंग व्यक्तीला त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एसएमएसद्वारे ओळखपत्र प्राप्त करण्याविषयीची सूचना दिली जाणार आहे. अपंगांना वितरित केल्या जाणार्‍या ओळखपत्राची वैधता पाच वर्ष राहणार असून, तिकीट काढण्यासाठी धक्के खात रांगेत उभे न राहता आणि कुठल्याही प्रकारचा फॉर्म न भरता यूनिक आयडी क्रमांकाद्वारे अपंग व्यक्तीस थेट इंटरनेटवरून तिकीट बुक करता येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. रेल्वेच्या चारही झोनमधील सर्व विभागीय व्यवस्थापकांना याबाबतच्या सूचना व निर्देश पाठविण्यात आले असल्याचेदेखील सुत्रांनी स्पष्ट केले आहे.