शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला ‘जीएमसी’च्या सात विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधांना ‘आयसीएमआर’ची मान्यता

By atul.jaiswal | Updated: March 6, 2018 15:37 IST

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीपूर्व ‘एमबीबीएस’ च्या सात विद्यार्थ्यांनी २०१७ या शैक्षणिक वर्षात पाठविलेल्या शोध प्रबंधांना नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर)ची मान्यता मिळाली आहे.

ठळक मुद्दे‘आयसीएमआर’ वर्ष १९७९ पासून ‘शॉर्ट टर्म स्टूडन्टशिप’ (एसटीएस) हा उपक्रम संपूर्ण भारतातील पदवीपूर्व एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी राबवित आहे.शुभम मिसाळ, वैशाली द्विवेदी, भाग्यश्री घुगे, काजल पाटील, निनाद काळे, आनंद क्रिष्णन, आकाश चौरेवार या सात विद्यार्थ्यांचे शोध प्रबंध आयसीएमआर-एसटीएस -२०१७ या उपक्रमाअंतर्गत निवडल्या गेले.सदर विद्यार्थ्यांनी मे २०१७ ते सप्टेंबर २०१७ या कालवधीत त्यांच्या गाईडच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे काम पार पडले.

अकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदवीपूर्व ‘एमबीबीएस’ च्या सात विद्यार्थ्यांनी २०१७ या शैक्षणिक वर्षात पाठविलेल्या शोध प्रबंधांना नवी दिल्ली येथील भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएमआर)ची मान्यता मिळाली आहे.वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रोत्साहीत करणे, यासाठी अद्ययावती ज्ञान मिळविण्यासाठी त्यांना तयार करणे, या उद्देशाने ‘आयसीएमआर’ वर्ष १९७९ पासून ‘शॉर्ट टर्म स्टूडन्टशिप’ (एसटीएस) हा उपक्रम संपूर्ण भारतातील पदवीपूर्व एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी राबवित आहे. ही संस्था पात्र व होतकरू विद्यार्थ्यांना विशेष्ट व मर्यादित संख्येत एसटीएस स्टूडन्टशिप देत असते. त्यानूसार शैक्षणिक वर्ष २०१७ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथील शुभम मिसाळ, वैशाली द्विवेदी, भाग्यश्री घुगे, काजल पाटील, निनाद काळे, आनंद क्रिष्णन, आकाश चौरेवार या सात विद्यार्थ्यांचे शोध प्रबंध आयसीएमआर-एसटीएस -२०१७ या उपक्रमाअंतर्गत निवडल्या गेले. सदर विद्यार्थ्यांनी मे २०१७ ते सप्टेंबर २०१७ या कालवधीत त्यांच्या गाईडच्या मार्गदर्शनाखाली संशोधनाचे काम पार पडले व त्यासंबंधीचा शोधप्रबंधाचा अहवाल अंतिम मंजुरीसाठी आयसीएमआरला पाठविले. तेथे या विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधांना मान्यता देण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला हे गत तीन वर्षांपासून या उपक्रमात सहभाग नोंदवित असून, या संशोधनात्मक उपक्रमाची जबाबदारी शरीरक्रिया शास्त्र विभाग प्रमुख डॉ. गजानन आत्राम सांभाळत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात यावर्षी आयसीएमआर-एसटीएस-२०१८ अंतर्गत ३० विद्यार्थ्यांच्या शोधप्रबंधांचा मसूदा आयसीएमआरच्या निवड प्रक्रियेकरीता सादर करण्यात आला आहे.दरम्यान, शोधप्रबंधांना मान्यता मिळालेले विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शकांचा अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या हस्ते ‘कॉलेज कौन्सिल’मध्ये सत्कार करण्यात आला. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे व सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयNew Delhiनवी दिल्ली