शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईला जाऊन हीराे व्हायचेय म्हणून साेडले घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST

अकाेला : लहान वयात घरातील कलह तसेच माेठ्यांचे बाेलणे मनावर परिणाम करणारे असल्याने याच वयात ही मुले यापासून दूर ...

अकाेला : लहान वयात घरातील कलह तसेच माेठ्यांचे बाेलणे मनावर परिणाम करणारे असल्याने याच वयात ही मुले यापासून दूर जाण्यासाठी तर टीव्हीवरील हीराे-हीराेइनचे आकर्षण, त्यांचे माेठे बंगले व राहणीमान आपणही करावे म्हणून घर साेडून जात असल्याची माहिती आहे. अशी घरून पळालेली मुले रेल्वेस्थानक तसेच बसस्थानकात आढळत असल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे. अकाेल्यात एकाच घरातील तीन बहिणी, तर एका घरातील दाेघे सख्खे चुलत भाऊ पळून जात असताना अकाेला रेल्वेस्थानकावर पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहेत तर काही मुलांना बसस्थानकावरून ताब्यात घेऊन कुटुंबीयांना साेपवले आहे. त्यामुळे घरातील कलह मुलांसमाेर हाेणार नाही याची खबरदारी घेण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.

सापडलेली मुले

२०१८ १५६

२०१९ १४२

२०२० १५२

२०२१ ८४

काेणाला बंगला-गाडीचे आकर्षण, तर काेणाला घरातील वादाचा कंटाळा

या लहान मुलांसमाेर घरातील वाद हाेत असल्याने त्यांना याचा कंटाळा येत आहे, तर याच मुलांना टीव्हीवरील हीराे-हीराेइन तर त्यांचे बंगले व राहणीमान याचे आकर्षण हाेत असल्याने नासमज असलेली ही मुले मुंबईला जाण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे. या मुलांना रेल्वेस्थानक तसेच बसस्थानकावरून ताब्यात घेऊन कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येत आहे.

घरातील कलहाने साेडले घर

सिंधी कॅम्प परिसरातून बेपत्ता असलेल्या मुलांची तक्रार झाल्यानंतर काही तासांतच त्याला अकाेला रेल्वेस्थानकावरून शाेधण्यात आले हाेते. या मुलाची चाैकशी केली असता घरातील कलहामुळे त्याने घर साेडल्याची माहिती पाेलिसांना दिली. पाेलिसांनी कुटुंबीयांना बाेलावून त्यांची समजूत घातली तर मुलगाही दिवसभर बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनाही त्यांची चूक कळली.

हिंगाेलीतील मुलगा अकाेल्यात आढळला

हिंगाेली येथील रहिवासी असलेला मुलगा अचानक घर साेडून निघून आला. नासमज असलेल्या या मुलाने बसने थेट अकाेला गाठून येथून पुढील प्रवास मुंंबईला करण्यासाठी रेल्वे स्टेशन गाठले. मात्र रेल्वे पाेलिसांना या मुलाची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याची चाैकशी करून मुलाला कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.

लहान मुले ही देवाघरची फुले आहेत. त्यांच्यासमाेर कुटुंबातील कलह टाळणे गरजेचे आहे. या मुलांसमाेर वाद हाेणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. तसेच त्यांना मित्रत्वाची वागणूक देऊन मुलांची प्रत्येक गाेष्ट समजावून घेण्याचा प्रयत्न करावा.

- विलास पाटील,

पाेलीस निरीक्षक, अकाेला