शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभीचा वैताग; ठरावाला ठेंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 01:26 IST

अकोला : मोर्णा नदीच्या पात्रात फोफावलेल्या जलकुंभीमुळे घाण सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना विविध आजारांची लागण होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी मनपाच्या स्थायी समितीने घेतलेल्या ठरावाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. जलकुंभीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना महापालिका काही पर्यायी उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ठळक मुद्देस्थायी समिती हतबलनदी पात्रात सांडपाणी तुंबले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : मोर्णा नदीच्या पात्रात फोफावलेल्या जलकुंभीमुळे घाण सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांना विविध आजारांची लागण होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी मनपाच्या स्थायी समितीने घेतलेल्या ठरावाला प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे. जलकुंभीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना महापालिका काही पर्यायी उपाययोजना करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  शहरातून निघणार्‍या घाण सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट मोर्णा नदीच्या पात्रात सोडल्या जाते. नदीपात्रातून सांडपाणी वाहून जाणे अपेक्षित असताना जलकुंभीमुळे सांडपाण्याचा निचरा न होता घाण तुंबल्याचे पहावयास मिळते. नदी पात्रातील जलकुंभीमुळे डासांची मोठय़ा प्रमाणात पैदास वाढली आहे. मच्छरांच्या त्रासामुळे नदीकाठच्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात सापडले असून, त्यांना विविध आजारांची लागण होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी प्रशासनाने ठोस प्रयत्न करणे गरजेचे असताना तसे होत नसल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे. जलकुंभी काढण्यासाठी प्रशासनाने आजपर्यंतही निविदा प्रकाशित केली नाही. नागरिकांना होणारा शारीरिक व मानसिक त्रास ध्यानात घेऊन महापालिकेच्या स्थायी समितीने जलकुंभी काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. स्थायी समितीच्या ठरावानुसार प्रशासनाने निविदा काढणे अपेक्षित असताना ठरावाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचे दिसून येते. 

‘स्थायी’ला ठराव घेण्याचा अधिकार नाही!मनपाच्या स्थायी समितीने जलकुंभी काढण्यासाठी मंजूर केलेल्या ठरावाला प्रशासनाने बाजूला सारले आहे. स्थायी समितीला केवळ आर्थिक धोरणासंबंधी निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. जलकुंभीसाठी मंजूर केलेला ठराव घेण्याचा ‘स्थायी’ला अधिकार नसल्याचा दावा प्रशासनाकडून होतो. प्रशासनाच्या दाव्यामुळे स्थायी समितीला नेमक्या कोणत्या अधिकारांतर्गत कोणत्या विषयांवर ठराव घेता येतात, असा मुद्दा उपस्थित झाला आहे.