शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

पतीसह सासू, सासर्‍याला जन्मठेप

By admin | Updated: August 26, 2014 22:00 IST

पत्नीला रॉकेल टाकून पेटविल्याचे प्रकरण

अकोला: पत्नीला अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने सोमवारी पती, सासू व सासर्‍याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कारंजा तालुक्यातील काजळेश्‍वर उपाध्ये येथील रामेश्‍वर कोंडू चव्हाण (४५) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या कांता नावाच्या मुलीचे पिंजर पोलिस ठाण्यांतर्गत येणार्‍या कानडी येथील गणेश लक्ष्मण पवार याच्यासोबत २0१0 मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सासरच्यांनी ५ ते ६ महिने कांताला चांगली वागणूक दिली. नंतर मात्र तिचा पैस्यासाठी छळ झाला. काही दिवस तिला सासरी पाठविण्यात आले नव्हते; परंतु जातपंचायतीमध्ये तडजोड करून कांताला पुन्हा साररी पाठविले. त्यानंतर १२ मे २0१३ रोजी रात्री ९.३0 वाजताच्या सुमारास कानडी येथील पंकज सुरेश राठोड याने कांताच्या वडिलांना फोन करून ती जळाल्याचे सांगितले. त्यामुळे कांताचे वडील रामेश्‍वर चव्हाण व त्यांचे नातेवाईक देवीदास पवार, उमेश उपाध्ये, सीताराम जाधव, त्याची पत्नी कौशल्या रुग्णालयात भेटण्यासाठी आले. यावेळी कांताने तिच्या वडिलांना पती, सासू व सासर्‍याने अंगावर रॉकेल टाकून पेटविल्याची माहिती दिली. कांताही ९७ टक्के जळाली होती. रामेश्‍वर चव्हाण यांच्या तक्रारीनुसार, पिंजर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ४९८ (ए), ३२३ गुन्हा दाखल केला; परंतु उपचारादरम्यान कांताचा मृत्यू झाल्याने आरोपींवर भादंवि कलम ३0२ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. या प्रकरणी न्यायालयाने सहा साक्षीदार तपासले. साक्ष व पुरावे ग्राहय़ मानून न्यायालयाने तिघाही आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी एक हजार दंड, दंड न भरल्यास दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मंगला पांडे यांनी बाजू मांडली. आरोपीतर्फे अँड. मुन्ना खान होते.