शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वादळामुळे घर कोसळल्याने संसार उघड्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:10 IST

शेतमजूर मंगेश नागोराव मालोकार यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

ठळक मुद्देवादळामुळे मंगेश मालोकार यांचे घर उद्धवस्त झाले. घरगुती साहित्य भिजल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

खेट्री : पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथे अचानक आलेल्या वादळामुळे शेतमजुराचा घर कोसळल्याची घटना रविवारी २९ मार्च रोजी रात्री १२ वाजता घडली. या घटनेमध्ये शेतमजूर मंगेश नागोराव मालोकार यांचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.त्यामुळे, त्यांचा संसार उघड्यावर आला आहे.पिंपळखुटा परिसरात रविवारी रात्री वादळासह अवकाळी पाउस झाला. वादळामुळे मंगेश मालोकार यांचे घर उद्धवस्त झाले. घराचे दोन दरवाजे, पंखा, टीव्ही,मोबाईल, टिन पत्रे, आदि साहित्याचे नुकसान झाले. तसेच घरातील गहू, तूर, डाळ, व इतर घरगुती साहित्य भिजल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मंगेश मालोकार यांचा संसार उघड्यावर आला आहे. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन त्यांना श्रीकृष्ण ज्ञान मंदिरामध्ये राहण्यासाठी व्यवस्था केली आहे. घटनेची माहिती मिळताच पातुरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या आदेशानुसार तलाठी एस. बी. भराळी, जी. व्ही. लाड यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. मालोकार यांना प्रशासनाने तातडीने मदत करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)कोरोमुळे मदतीत अडथळाकोरोना व्हायरसमुळे संचारबंदी सुरू असल्याने कुटुंबाजवळ कोणीही जायला तसेच मदत करायला तयार नाही. त्यामुळे मंगेश मालोकार यांच्यासमोर जीवन जगण्यासाठी एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे तत्काळ नुकसान भरपाई मिळण्याची त्यांना अपेक्षा आहे.तहसीलदारांच्या आदेशानुसार पंचनामा केला असून, अहवाल तहसील कार्यालयात सादर करू.मालोकार यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.एस. बी. भराळी, तलाठी

 

टॅग्स :AkolaअकोलाHailstormगारपीट