शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम नोटिसांमुळे शेकडो शिक्षक बिथरले!

By admin | Updated: May 16, 2017 02:07 IST

खुल्या प्रवर्गातील नियुक्ती झाली राखीव प्रवर्गात

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्हा परिषदेत गेल्या काही वर्षात राबवण्यात आलेल्या शिक्षक भरती घोळातील एकेक नमुना पुढे येत आहे. २० ते २५ वर्षांपूर्वी सर्वसाधारण प्रवर्गातून नियुक्ती झाल्याचे पत्र असलेल्या शिक्षकांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी शिक्षण विभागाने अंतिम नोटिसा बजावल्या. त्यातच नोटिसमध्ये नमूद संदर्भांचे कोणतेही पत्र न देताच अंतिम नोटिस मिळाल्याने या प्रकारात मोठा घोळ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षक आस्थापनेची संवर्गनिहाय बिंदू नामावली २००७ मध्ये तयार करण्यात आली. त्यामध्ये प्रचंड गोंधळ करण्यात आला. ती अंतिम करण्यापूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाने अनेक आक्षेप नोंदवले. त्यामध्ये गेल्या काही वर्षापासून आतापर्यंत अनुसूचित जमाती, विशेष मागासप्रवर्ग, विमुक्त जाती-अ, भज-ब, भज-ड, इतर मागासप्रवर्ग या सर्व प्रवर्गात सरळ सेवेने किंवा पदोन्नती दिलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात निवड समितीने केलेल्या प्रवर्गनिहाय याद्या, नियुक्ती आदेश, जात वैधता प्रमाणपत्र, तसेच आंतरजिल्हा बदलीने नियुक्ती आदेश, एसटीच्या पदावर गैरआदिवासी कर्मचाऱ्यांची नियुक्ती, ज्या विशेष मागासप्रवर्गातील कर्मचाऱ्यांनी जात वैधता सादर केली नाही, १५ जून १९९५ नंतर विशेष मागासप्रवर्गातील उमेदवारांना एसटी प्रवर्गात नियुक्ती दिली. त्यांच्या सेवा समाप्त करणे, या सगळ््या गंभीर प्रकारांची संपूर्ण माहिती तसेच जात वैधता प्रमाणपत्र न घेताच नियुक्ती देणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचा आदेश ६ जुलै २०११ रोजी देण्यात आला. त्यानंतर ८ जुलै २०११ रोजी विधिमंडळाच्या विमुक्त जाती, भटक्या जमाती कल्याण समितीने या गंभीर प्रकाराची दखल घेत कारवाईचे निर्देश दिले. प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील १४७ शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत नोटिस बजावल्या आहेत.१९९२ पासून नियुक्त झालेल्यांनाही नोटिसात्या नोटिसा बजावताना तत्कालीन प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाकडून नियुक्ती मिळालेल्या शिक्षकांनाही देण्यात आल्या. विशेष म्हणजे, त्या शिक्षकांच्या आदेशात नियुक्तीचा प्रवर्ग खुला दाखवण्यात आला आहे. त्यांना जातवैधता प्रमाणपत्र कशासाठी मागवले, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच बिंदू नामावली तयार करताना त्यांची नियुक्ती राखीव प्रवर्गातून दाखवण्याचा घोळ झाल्याचे दिसून येत आहे. समितीने फेटाळले जातवैधता प्रस्ताव विशेष म्हणजे, ज्या शिक्षकांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. त्यांची नियुक्ती कोणत्या संवर्गातून झाली, याबाबतचे पत्र जातपडताळणी समितीला द्यावे लागते. ज्यांची नियुक्ती सर्वसाधारण प्रवर्गातून झाली. त्यांना तेच पत्र देण्यात आले. नियुक्ती सर्वसाधारण प्रवर्गातून असल्याने जातवैधता प्रस्तावाची गरज नाही, असे सांगत समितीने अनेक शिक्षकांचे प्रस्तावही फेटाळले आहेत.