शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लोकन्यायालयामध्ये शेकडो तक्रारींचा निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 13:34 IST

अकोला: जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात शेकडो प्रकरणे यशस्वी तडजोडीने निकाली काढण्यात आली. फौजदारी, दिवाणी व कौटुंबिक प्रकरणे दोन्ही पक्षाच्या समजुतीने निकाली काढण्यात आली आहेत.

अकोला: जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी झालेल्या राष्ट्रीय लोकन्यायालयात शेकडो प्रकरणे यशस्वी तडजोडीने निकाली काढण्यात आली. फौजदारी, दिवाणी व कौटुंबिक प्रकरणे दोन्ही पक्षाच्या समजुतीने निकाली काढण्यात आली आहेत.राष्ट्रीय लोकन्यायालयाचे रविवारी देशभर जिल्हा व तालुकास्तरावर आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता प्रमुख जिल्हा न्यायाधीश एन. शिवराज खोब्रागडे यांच्या हस्ते न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ए.पी. कोकरे यांच्यासह सर्व न्यायाधीश, वकील उपस्थित होते. न्यायालयात दाखल व वादपूर्व प्रकरणांत लोकन्यायालयात समजुतीने तोडगा काढण्यात आला. यावेळी न्यायालयात समन्वयासाठी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एन. शिवराज खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात कामकाजास प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, दिवसभर अकोला न्यायालयासह जिल्ह्यातील सर्वच तालुका स्तरावरील न्यायालयात न्यायप्रविष्ट फौजदारी, दिवाणी अशी शेकडो प्रकरणे आपसात तडजोडीने मिटली. न्यायालयात दाखलपूर्व वीज वितरण कंपनीची प्रकरणे, बँकांची प्रकरणे, आर्थिक फसवणुकीची प्रकरणे, कौटुंबिक वाद, शेतीच्या वादाची प्रकरणे, अपघाती प्रकरणे, विम्याची प्रकरणे अशी प्रकारे सर्वच दिवाणी व फौजदारी प्रकरणे निघाली. लोकन्यायालय यशस्वीतेसाठी विधी सेवा समितीचे सचिव ए.पी. कोकरे प्रयत्नशील होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश (पहिले) मोनिका आयर्लंड, जिल्हा न्यायाधीश ए.एस. जाधव, न्यायाधीश व्ही.डी. केदार, न्यायाधीश डी.बी. पतंगे, न्यायाधीश डी.पी. शिंगाडे, न्यायाधीश एन.जी. शुक्ला व कोर्ट मॅनेजर अभिजित जनईकर, न्यायालय प्रबंधक अशोक लव्हाळे, अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल इंगळे, महिला उपाध्यक्ष अ‍ॅड. मुमताज देशमुख, अ‍ॅड. अनिल पाटील, अ‍ॅड. अनिल शुक्ला, अ‍ॅड. नितीन उंबरकर, अ‍ॅड. युसूफ नौरंगाबादी, अ‍ॅड. सी.एन. वानखडे, अ‍ॅड. भिसे, अ‍ॅड. मंगेश बोर्डे, अ‍ॅड. बदर, अ‍ॅड. संतोष खडसे यांच्यासह बहुसंख्येने संख्येने वकील, पक्षकार व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय