शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

अमरावती विभागातील शेकडो लघुप्रकल्प कोरडे!

By admin | Updated: January 27, 2016 23:24 IST

भीषण पाणीटंचाईचे संकेत; प्रशासनाचा कृती आराखडा कागदावरच.

सुनील काकडे/वाशिम: गतवर्षीच्या पावसाळ्यात संपूर्ण विदर्भात अल्प प्रमाणात पाऊस झाला. परिणामी मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांच्या पाणीपातळीत अपेक्षित वाढ झाली नाही. अशातच रब्बी हंगामातील पिकांसाठी झालेला उपसा आणि जमिनीची होणारी धूप या कारणांमुळे सद्यस्थितीत अमरावती विभागातील ४२८ लघुसिंचन प्रकल्पांपैकी सुमारे २५0 प्रकल्प कोरडे पडले आहेत. मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पांची पाणी पातळीदेखील झपाट्याने खालावत असल्याने यंदाच्या उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई जाणवणार आहे. सद्यस्थितीत अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला आणि वाशिम या पाच जिल्ह्यांमधील ४२८ लघुप्रकल्पांमध्ये केवळ २0 ते २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील १0७ पैकी तब्बल ६0 प्रकल्प कोरडे पडले असून, उर्वरित चार जिल्ह्यांमध्येही भयावह स्थिती उद्भवली आहे. हातपंप, कूपनलिका, विहिरी हे जलस्रोतदेखील कोरडे पडल्याने जनमानसासोबतच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही भेडसावत आहे. तथापि, जिल्हा प्रशासनाने कोट्यवधी रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा कागदोपत्री तयार करण्यापलीकडे कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. वाशिम जिल्ह्यात साडेपाच कोटींपेक्षा अधिक रकमेचा कृती आराखडा तयार आहे; पण ७९३ पैकी ५६0 गावे टंचाईग्रस्त असताना एकाही गावात अद्याप साधे टँकरदेखील सुरू झाले नसल्याची वस्तुस्थिती आहे. जलयुक्त शिवारचा फुगा हवेतच विरला!मोठा गाजावाजा करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविले. या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात कोट्यवधी लिटर पाण्याची साठवण झाल्याचा आव प्रशासकीय पातळीवरून आणण्यात आला; मात्र सध्या उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईने राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

अख्खा मराठवाडा तहानला!महाराष्ट्रातील इतर विभागांच्या तुलनेत यंदा मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचे चटके जास्त सोसावे लागत आहेत. मराठवाड्यातील ७२८ लघुप्रकल्पांमध्ये आजमितीस उणापुरा दोन ते अडीच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ५00 पेक्षा जास्त प्रकल्प कोरडेठण्ण पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठय़ा प्रकल्पांपैकी बीड जिल्ह्यातील माजलगाव, मांजरा, उस्मानाबादमधील निम्न तेरणा, सिना कोळेगाव आणि नांदेड जिल्ह्यातील मनार या पाच प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहोचली असून, जायकवाडी, पूर्णा येलदरी, पूर्णा सिद्धेश्‍वर, ऊध्र्व पैनगंगा, विष्णुपुरी, निम्न दुधना हे मोठे प्रकल्प अल्पावधीतच कोरडे पडतील, अशी भीती वर्तविली जात आहे.