शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ओशाळली माणूसकी.....अंत्यसंस्कारासाठी हातगाडीवरून नेला मृतदेह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 10:15 IST

एका ५५ वर्षीय इसमाला कोरोनाच्या भीतीने कुणीही खांदा द्यायला तयार नसल्याने अखेर नातेवाइकाने हातगाडीवर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेऊन अंत्यसंस्कार केले.

तेल्हारा : अकोला शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोरोनाच्या धास्तीमुळे माणुसकी हरवत असल्याची प्रचिती २९ मे रोजी तेल्हारा शहरात आली. शहरातील एका ५५ वर्षीय इसमाला कोरोनाच्या भीतीने कुणीही खांदा द्यायला तयार नसल्याने अखेर नातेवाइकाने हातगाडीवर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेऊन अंत्यसंस्कार केले.कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे स्वत:चे नातेवाईक सुद्धा अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. शहरातील आठवडी बाजारात राहणारे गजानन भटकर यांचा २९ मे रोजी सायंकाळी मृत्यू झाला. घरी पत्नी व लहान मुले, त्यात लॉकडाउनमुळे नातेवाईक येऊ शकले नाहीत. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची, त्यामुळे अंत्यसंस्कार करणेसुद्धा कठीण होते. त्यात मृतदेहाला खांदा द्यायला कोणी नसल्याने मोठा प्रश्न मृतकाच्या पत्नीसमोर उभा राहिला होता. अशातच मृतकांच्या पत्नीचा भाऊ शहरातच राहतो. कोणी खांदा द्यायला तयार नसल्याने त्यांनी हातगाडी घेऊन त्याच्यावर मृतदेह ठेवून स्मशानभूमी गाठली व मृतकावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने मात्र माणुसकी हरवली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. तेल्हारा शहरात काही महिन्यांपूर्वी सामाजिक पुढाकारातून शवगाडी तयार करण्यात आली. शहरातील काही जणांनी ही गाडी मिळण्यासाठी प्रयत्न केला; मात्र ती सध्या परिस्थितीत बंद असल्याने त्यांना हातगाडीवरून मृतदेह नेण्याची वेळ आली.  

युवकाने दिला माणुसकीचा परिचयशहरातील शिवाजी चौक येथे राहणारा युवक मनीष गवळी याने स्वत:हून पुढाकार घेऊन मृतकाच्या घरच्या परिस्थितीबद्दल माहिती घेतली. त्याला मृतकाच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याचे समजले. यावेळी त्याने मृतकावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लागणारा खर्च देऊन आपली माणुसकी दाखवली. 

 

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराcorona virusकोरोना वायरस बातम्या