शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गृहिणींचे अन्नदान रुग्णांसाठी ठरत आहे ‘अमृत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 13:37 IST

दररोज येणाऱ्या डब्यांतून सर्वोपचारमधील शेकडो रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना ‘अमृता’चा घास मिळतो.

अकोला: श्रीमंती पैशांची कितीही असली, तरी ती माणुसकीतून झळकायला हवी. याच माणुसकीच्या श्रीमंतीचा परिचय शहरातील काही गृहिणींच्या कार्यातून होतो. ज्यांच्या घरून दररोज येणाऱ्या डब्यांतून सर्वोपचारमधील शेकडो रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना ‘अमृता’चा घास मिळतो.सर्वोपचार रुग्णालय, ज्या ठिकाणी दररोज हजारो रुग्णांवर उपचार होतो. यात बहुतांश रुग्ण बाहेरगावचे असतात. त्यापैकी अनेकांची खाण्या-पिण्याचीही सोय नसते. अशा परिस्थितीत सर्वोपचारमध्ये काही युवक घरगुती जेवणाचे डबे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना वितरित करताना दिसून येतात; पण हे जेवण त्या युवकांकडून किंवा कुठल्या संस्थेकडून येत नाही. हे जेवण येते ते शहरातील विविध भागातील गृहिणींच्या स्वयंपाक घरातून. अनेकदा अशा प्रकारच्या अन्नदानास विरोधही केला जातो. थकलेल्या अन् गरजूंना कुठलाच मोबदला न घेता वितरित करण्यात येणाऱ्या या अन्नदानातून अनेकांची मने तृप्त होताना दिसून येतात. सर्वोपचारपर्यंत एका वाहनावर आलेले हे अन्न येथील समाजकार्य करणारे काही युवक रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांपर्यंत पोहोचवतात. यामध्ये आशिष सावळे, नितीन सपकाळ, विशाल कांबळे यांच्यासह इतरही युवक नियमितपणे अन्न वितरणाचे हे कार्य करतात.प्रसिद्धीचा लोभ नाही!हे जेवणाचे डब्बे पाठविणाºया महिलांसोबत संपर्क साधला असता, आमची ही शुद्ध समाज सेवा असून, त्यासाठी आम्हाला प्रसिद्धी नको असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातूनच त्यांच्या या समाजसेवेची खरी तळमळ दिसून आली. रुग्णांसाठी अन्नदान करणाºया या गृहिणी गोरक्षण रोड, गीता नगर, हरिहरपेठ आणि सिंधी कॅम्प या भागातील आहेत.या ठिकाणी केले जात आहे अन्नदानसर्वोपचार रुग्णालयातील टीबी वॉर्ड, स्किन वॉर्ड यांच्यासह सर्वोपचार परिसरात अत्यंत गरजू व्यक्तींनाच हे जेवण दिल्या जाते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय