शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्टीतील शिक्षकांच्या सर्मथनार्थ सरसावले जि.प. सदस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:31 IST

अकोला : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या काही शिक्षकांवर कारवाई केली जात नसताना, हुक्का पार्टीतील शिक्षकांवर कारवाई केल्यास, त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचे सांगत, हुक्का पार्टीतील शिक्षकांच्या सर्मथनात जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी काही सदस्य चांगलेच सरसावले.

ठळक मुद्देस्थायी समितीची सभा म्हणे, कारवाई केल्यास अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या काही शिक्षकांवर कारवाई केली जात नसताना, हुक्का पार्टीतील शिक्षकांवर कारवाई केल्यास, त्यांच्यावर अन्याय होणार असल्याचे सांगत, हुक्का पार्टीतील शिक्षकांच्या सर्मथनात जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी काही सदस्य चांगलेच सरसावले.पातूर रोडवरील एका ढाब्यावर हुक्का पार्लरमध्ये नशा करणार्‍या जिल्हा परिषद शाळांवरील १0 शिक्षकांवर पोलीस कारवाई करण्यात आली. हुक्का पार्टीत पोलीस कारवाई करण्यात आलेल्या संबंधित शिक्षकांना तातडीने निलंबित करण्याची मागणी, गत १८ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या सभेत सदस्यांनी केली. त्यानुषंगाने यासंदर्भात कारवाई करण्याचा आदेश शिक्षण सभापतींनी प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांना दिला होता. या पृष्ठभूमीवर बुधवारी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत हुक्का पार्टीतील शिक्षकांवर कारवाईचा मुद्दा तीन सदस्यांनी उपस्थित केला. एकीकडे काही शिक्षकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जात नाही, तर दुसरीकडे हुक्का पार्टी प्रकरणात शिक्षकांवर निलंबनाची कारवाई केल्यास, संबंधित शिक्षकांवर अन्याय होणार असल्याची भूमिका जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, शोभा शेळके व डॉ. हिंमत घाटोळ यांनी सभेत मांडली. हा मुद्दा शिक्षकांचा वैयक्तिक असून, यासंदर्भात कारवाई करताना विचार करण्याची मागणीही संबंधित तीन सदस्यांनी सभागृहात केली. त्यामुळे हुक्का पार्टीतील शिक्षकांच्या सर्मथनात तीन जिल्हा परिषद सदस्य उतरल्याचे चित्र जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत दिसत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, महिला व बालकल्याण सभापती द्रौपदा वाहोकार, कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, सदस्य दामोदर जगताप, विजय लव्हाळे, गोपाल कोल्हे, डॉ. हिंमत घाटोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जवादे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पडताळणी करूनच कारवाईचे आश्‍वासन!हुक्का पार्टी प्रकरणात शिक्षकांविरुद्ध कोणत्या कलमान्वये गुन्हे दाखल झाले, याबाबत पोलीस विभागाकडून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि पडताळणी केल्यानंतरच कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार यांनी सभेत दिले.