शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात वाढली हुडहुडी; तीन दिवसांत पारा ५ अंशांनी घसरला!

By रवी दामोदर | Updated: January 16, 2024 19:14 IST

किमान तापमान १२ अंशावर : वाढलेली थंडी रब्बी पिकाला पोषक

रवी दामोदर, अकोला

अकोला : सध्या उत्तर भारतात थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे. जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ५ अंशांनी पारा घसरला असून, पहाटेच्या सुमारास हुडहुडी वाढली आहे. मंगळवार, दि.१६ जानेवारी रोजी पारा १२.३ अंशावर होता. वाढलेली थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी पोषक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, आगामी काही दिवस थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.     

गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात थंडी, गारठा वाढला आहे. त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी लहानग्यापासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण दिवसादेखील उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. स्वेटर, कानटोपी, मफलरचा, जॅकेट घालून घराबाहेर पडताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर शहरासह ग्रामिण भागातही शेकोटी पेटण्यास सुरूवात झाली आहे. तापमानाचा पाराही सातत्याने खाली सरकत आहे. त्यात मंगळवारी दि.१६ जानेवारी रोजी अकोल्याचे तापमान विदर्भात कमी नोंदविल्या गेले. जिल्ह्याचे तापमान कमाल ३०.८ तर किमान १२.३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. त्यामुळे सकाळपासून दिवसभर हुडहुडी भरणाऱ्या थंडीचा अनुभव अकोलेकरांनी घेतला. जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. पहाटे, सकाळी व रात्रीच्यावेळी थंडीचा जोर तसेच वारेही वाढले आहे. दिवसभर हुडहुडणारी थंडी अनुभवायास मिळत असल्याने उबदार कपड्यांनाही मागणी वाढली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातही आता शेकोट्या पेटल्याच्या पहावयास मिळत आहे.-------------------------------

विदर्भातून सर्वात कमी तापमानाची नोंद यवतमाळनंतर अकोल्यातअकोला सार्वाधिक उष्ण जिल्हा म्हणून अनेक वेळा नोंद होते. परंतू गत दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला असून, पारा घसरला आहे. मंगळवारी विदर्भातून सर्वात कमी तापमानाची नोंद यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आली असून, त्यापाठोपाठ अकोला जिल्ह्यात नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसात पारा ५ ते ६ अंशांनी घसरला असून, किमान तापमान १२.३ अंशावर होते.

---------------------------------------------असे आहे विदर्भातील जिल्ह्याचे किमान तापमान

जिल्हा       -      किमान तापमानअकोला     -        १२.३अमरावती    -         १३.५बुलढाणा    -         १२.६चंद्रपूर       -      १४.४गडचिरोली   -          १४.२गोंदिया   -          १२.४नागपूर    -         १४.२वर्धा        -             १४.०वाशिम     -        १४.०यवतमाळ    -         ११.५

टॅग्स :Akolaअकोला