शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

एचटीबीटी कपाशी लागवड; शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 13:52 IST

एचटीबीटी कपाशी व बीटी वांग्यांची अडगाव येथील शेतांमध्ये लागवड केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता ललीत बहाळे यांच्यासह १२ जणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले.

हिवरखेड (अकोला ): मान्यता नसलेल्या एचटीबीटी कपाशी व बीटी वांग्यांची अडगाव येथील शेतांमध्ये लागवड केल्याप्रकरणी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता ललीत बहाळे यांच्यासह १२ जणांविरुद्ध हिवरखेड पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले. एचटीबीटी कपाशी व बीटी वांलागवड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.‘माझं वावर-माझी पॉवर’, या शेतकरी तंत्रज्ञान स्वतंत्रताकरिता संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देत शेतकऱ्यांनी यापूर्वी एचटीबीटी बियाणे पेरणीचे तीन प्रयोग यशस्वी केले आहेत. २४ जूनला एचटीबीटी कापूस वाणाची पेरणी व बीटी वांग्याचे रोप टाकण्याचा चौथा प्रयोग करण्यात आला. एचटीबीटी बियाण्यांना मान्यता नसल्याने या बियाण्यांची लागवड करु नये, असे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यानंतरही शेतकरी संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र येत शेतकºयांनी एचटीबीटी कपाशीची लागवड केली. या प्रकरणी तेल्हारा तालुक्याचे कृषी अधिकारी मिलिंद वानखडे यांनी केलेल्या तक्रारीवरुन हिवरखेड पोलिसांनी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता ललीत सुधाकर बहाळे यांच्यासह लक्ष्मीकांत कौठकर, सिमा नराळे, प्रमिला भारसाकळे, प्रज्ज्वल बदरखे, निलेश नेमाडे, विक्रांत बोंद्रे, सतिष सरोदे, अमोल मसुरकार, गोपाल निमकर्डे, मोहन खिरोडकर, दिनेश गिºहे यांच्याविरु भादंवीच्या कलम ४२०, १४३, १८६, १८८, पर्यावरण संरक्षक कायदा १९८६ च्या कलम ७, ८, ११, १५/१, बियाणे कायदा १९६६ च्या कलम ७, एबीसीडी, १४ एबीसीडी अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास एसडीपीओ सुनील सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सोमनाथ पवार करीत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाTelharaतेल्हाराagricultureशेतीFarmerशेतकरी