शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

कसे शिकविणार...? शिकवण्याच्या परीक्षेत शिक्षकच नापास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 13:24 IST

जिल्ह्यातील १४ पैकी १० शिक्षक शिकवण्याच्या गुणवत्तेत ५० टक्केही गुणवंत नाहीत, तर सहा शिक्षकांना काठावर पास होण्याइतकेही गुण मिळाले नाहीत.

अकोला: जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गुणवत्तेचे धडे देणे अपेक्षित असताना जिल्ह्यातील १४ पैकी १० शिक्षक शिकवण्याच्या गुणवत्तेत ५० टक्केही गुणवंत नाहीत, तर सहा शिक्षकांना काठावर पास होण्याइतकेही गुण मिळाले नाहीत. हा धक्कादायक प्रकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रत्यक्ष घेतलेल्या शिकवण्याचा पाठातून पुढे आला आहे. या शिक्षकांवर कोणती कारवाई करावी, यावर शिक्षण समितीकडून ठराव घेतला जाईल, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सोमवारी सांगितले.जिल्ह्यातील शिक्षक अध्यापन कार्यात किती सक्षम आहेत, याची पडताळणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या कार्यशाळेत करण्यात आली. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी समिती गठित केली. पाच सदस्यीय समितीमध्ये संस्थेचे प्राचार्य, ज्येष्ठ अधिव्याख्याता विस्तार अधिकारी परोपटे, विस्तार अधिकारी अरविंद जाधव, गटशिक्षणाधिकारी दिनेश दुतोंडे यांचा समावेश होता. समितीसमोर १४ शिक्षकांनी पाठाचे सादरीकरण केले. त्यामध्ये १० शिक्षकांना ५० पैकी २५ गुणही मिळाले नाहीत. तर सहा शिक्षक १७ गुणांचा टप्पा पार करू शकले नाहीत. उत्तीर्णतेसाठी ३५ टक्के गुणापर्यंतही शिक्षक पोहोचले नाही. त्यांच्या शैक्षणिक, अध्यापन गुणवत्तेचे समितीसमोर वाभाडे निघाले आहे. या शिक्षकांमुळे जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी सुधारणार, हा प्रश्नही पुढे आला. आता त्यांच्यावर कोणती कारवाई करावी, याबाबतची चर्चा शिक्षण समिती, पदाधिकारी करणार आहेत.- या शिक्षकांचा लागला निकाल...७ जून रोजी मोºहळ येथील नलिनी तायडे, मोझरी येथील साहेबराव लोणाग्रे, पुनोती- अरुण गंगाराम राठोड, धोतरखेड-गोपाल लोखंडे, प्रवीण कºहाळे, राजंदा- बिरसिंग डाबेराव, कोठारी- अनिल चºहाटे, साईनगर- मोरताळे, देशमुख, वाकी- मोहन टेकाडे, सांगळूद- शारदा भरणे, खडका- विजय तायडे, कळंबेश्वर- जी. पी. कोल्हे, पातूरचे गटसमन्वयक के.डी. चव्हाण यांनी समितीसमोर पाठाचे सादरीकरण केले. त्यासाठी प्रत्येकाला त्यासाठी २० मिनिटे देण्यात आली होती. समितीने केलेल्या परीक्षणानंतरचा निकाल धक्कादायक आहे.- मुख्याध्यापकांचीही झाडाझडतीरेकॉर्डमध्ये घोळ असलेल्या पिंजर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हबीबोद्दीन मोइनोद्दीन, पिंप्री शाळेचे उमेश चोपडे, वडाळी सटवाई शाळेच्या अनिता देशमुख, कंझरा शाळेचे मेश्राम, सिरसो शाळेच्या लता मालवे, खैरखेडचे सुरेंद्र दिवनाले यांचीही तपासणी झाली आहे. त्यांचा निकाल बाकी आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक