शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

किती उमेदवार मारणार बाजी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 01:19 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सिनेट निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया रविवारी पार पडली.  विविध मतदारसंघामध्ये अकोला जिल्हय़ातून ३५ उमेदवार रिंगणात होते. सिनेट निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबर रोजी अमरावती विद्यापीठात मतमोजणी होणार आहे.

ठळक मुद्देसिनेट निवडणूक आज मतमोजणी, शिक्षण क्षेत्राचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सिनेट निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया रविवारी पार पडली.  विविध मतदारसंघामध्ये अकोला जिल्हय़ातून ३५ उमेदवार रिंगणात होते. सिनेट निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबर रोजी अमरावती विद्यापीठात मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीमध्ये नुटा, विजुक्टा, अभाविप, शिक्षक मंच यासह अनेक संघटनांचे उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांमधून कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार बाजी मारतो आणि अकोला जिल्हय़ातील किती उमेदवारांना सिनेटवर जाण्याची संधी मिळते, याकडे शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. दर पाच वर्षांनी अमरावती विद्यापीठामध्ये विविध मतदारसंघांसाठी सिनेटची निवडणूक होते. यावर्षी अमरावती विद्यापीठांतर्गत सिनेट निवडणुकीसाठी २0५ उमेदवार विविध मतदारसंघामधून उभे होते. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात पदवीधारकांची नोंदणी करण्यात आली. शिक्षक संघटनांसह शिक्षक मंच, अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पदवीधारकांची नोंदणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले; परंतु रविवारी झालेल्या सिनेट निवडणुकीसाठी पदवीधर मतदारसंघामध्येच सर्वात कमी मतदान झाले आणि सर्वाधिक उमेदवार याच मतदारसंघामध्ये रिंगणात आहेत. त्यामुळे पदवीधर मतदारसंघामध्ये अकोल्यातून कोण बाजी मारतो, हे औत्सुक्याचे ठरेल. पदवीधर मतदारसंघामध्ये अकोल्यातून विविध प्रवर्गामध्ये उमेश कुडमेथे, अनिता काळमेघ, विवेक बोचे, डॉ. अविनाश बोर्डे, संजय देशमुख, समीर गडकरी, गजानन मानकर, रवींद्र तायडे रिंगणात होते. परंतु यापैकी कोणत्या प्रवर्गातून कोण निवडून येतो, याकडे पदवीधरांचे लक्ष आहे. प्राचार्य मतदारसंघामध्ये विविध प्रवर्गात डॉ. श्रीप्रभु चापके, डॉ. मधुकर पवार, डॉ. अंबादास कुलट, डॉ. जगदीश साबू, डॉ. संतोष ठाकरे, शिक्षक मतदारसंघामधून डॉ. ज्ञानदेव इंगळे, डॉ. ममता इंगोले, प्रा. विवेक हिवरे, प्रा. रवींद्र मुंडरे, डॉ. दिनकर उंबरकर, तर अभ्यास मंडळ मतदारसंघामधून डॉ. आनंद काळे, अनिल ठाकरे, डॉ. बंडू किर्दक, संध्या काळे, विजय भगत, श्रीकांत सातारकर, डॉ. मुकुंद इंगळे, श्रीकृष्ण काकडे, संतोष ठाकरे, डॉ. किरण खंडारे, भास्कर पाटील, मो. अमजद असदुल्लाह काझी, डॉ. किशोर देशमुख, डॉ. प्रशांत कोठे आदी उमेदवार रिंगणात होते. या सर्व मतदारसंघामधे अमरावती, बुलडाणा, यवतमाळ व वाशिममधील उमेदवारसुद्धा रिंगणात होते. त्यामुळे आता पदवीधर, शिक्षक, प्राचार्य, अभ्यासमंडळ, शिक्षणसंस्था प्रतिनिधी मतदारसंघात अकोल्यातील किती उमेदवारांना सिनेटवर जाण्याची संधी मिळते, याकडे अकोल्यातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :universityविद्यापीठ