शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयी राहाल तरच घरभाडे!

By admin | Updated: October 10, 2016 03:19 IST

न्यायालयाचे आदेश; कर्मचा-यांना भत्त्यावर सोडावे लागणार पाणी.

अकोला, दि. 0९- ग्रामीण भागात कार्यरत असलेला कोणताही कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्यास त्याला घरभाडे मिळणे दुरापास्त होणार आहे. घरभाडे भत्ता मिळण्यासाठी कर्मचार्‍याला मुख्यालयीच राहावे लागणार, असा आदेश वित्त विभागाने शनिवारी दिला. त्यामुळे आता जिल्हा परिषदेसह विविध विभागांच्या शेकडो कर्मचार्‍यांना त्या भत्त्यावर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. ग्रामीण भागात मुख्यालयी राहणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना वित्त विभागाने १९८४ पासून घरभाडे भत्ता सुरू केला. त्यामध्ये हा भत्ता मिळण्यासाठी पात्र कर्मचार्‍यांची अटही ठरलेली आहे; मात्र त्यानंतर १९८८ मध्ये ती अट काढून टाकण्यात आली होती. त्यानंतर २00८ मध्ये पंचायत राज समितीने जिल्हा परिषदेच्या वर्ग तीन आणि चारमधील कर्मचारी मुख्यालयी राहत नसतील, तर त्यांचा घरभाडे भत्ता, वेतनवाढ रोखण्यासोबतच शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले. ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या या परिपत्रकास जळगाव येथील राज्य प्राथमिक शिक्षक संघाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने परिपत्रकामुळे घरभाडे भत्ता रोखून ठेवला असल्यास तो तत्काळ अदा करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशानुसार शासनाने आता नव्याने आदेश देत १९८८ मध्ये काढून टाकलेली १९८४ ची अट पुन्हा अमलात आणण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश १ नोव्हेंबर २0१६ पासून लागू होणार आहेत. ग्रामविकास, महसूल, कृषीच्या कर्मचार्‍यांना अँलर्जीजि. प.च्या विविध विभागांचे कर्मचारी ग्रामीण भागात नियुक्त आहेत; मात्र त्यापैकी शेकडो कर्मचारी मुख्यालयी वास्तव्यास नाहीत. त्यामध्ये शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविकांचा समावेश आहे.शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करावीच लागेल त्याबाबत उद्या सोमवारी सर्व विभाग प्रमुखांकडून माहिती घेऊन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी निर्देश दिले जातील.- अरुण विधळे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.