शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या विद्यार्थिनीचा खून

By admin | Updated: October 10, 2014 23:52 IST

अकोला जिल्ह्यातील घटना; चार संशयित ताब्यात.

आकोट (अकोला): अकोला जिल्ह्यातील आकोट येथील एका बारावीच्या विद्यार्थिनीची निर्घृण ह त्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. मृतक विद्यार्थिनीचे नाव शुभांगी अरविंद तेलगोटे (१७) असून, याप्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. अकोला जिल्ह्यातील आकोट येथील देशमुख प्लॉट-जेतवननगर परिसरातील रहिवासी, इलेक्ट्रिशियन अरविंद तेलगोटे यांची मोठी मुलगी शुभांगी ही शुक्रवारी शाळेतून घरी आल्यानंतर काही वेळाने शौचास जात असल्याचे सांगून घराबाहेर गेली. बराच वेळ होऊनही, ती परत न आल्यामुळे तिची आई शोधायला गेली असता, ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार आढळून आले, तर रक्ताचे थारोळे दोन ठिकाणी साचल्याचे दिसले. तिला तातडीने रूग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार कैलास नागरे यांनी घटनास्थळावर पाहोचून, तपास सुरू केला. आरोपींबाबत माहिती काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. शुभांगीच्या बहिणी, आई-वडील तसेच परिसरातील नागरिकांकडूनही त्यांनी माहि ती गोळा केली. घटनास्थळी श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले होते. श्‍वानाने आरोपींचा माग घेत, आकोट रेल्वे स्टेशनपर्यंतचा भाग दाखविला. या प्रकरणी ४ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. घटनास्थळी एक मोबाइल फोन आढळून आल्याची माहिती असून, त्या आधारे पोलिस तपास करीत आहेत. उत्तरित तपासणीकरिता शुभांगीचा मृतदेह अकोला येथे पाठविण्यात आला असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकेल, असे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक मीणा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी भेट दिली.